Next
सिंबायोसिस शाळेस विशेष पारितोषिक
प्रेस रिलीज
Tuesday, February 06 | 05:11 PM
15 0 0
Share this story

पुणे : माहिती तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांत कल्पक वापर कसा करता येईल याची विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच ओळख व्हावी या उद्देशाने डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने सुरू केलेल्या ‘सायबर जिनियस’ या आंतरशालेय स्पर्धेत यंदा सिंबायोसिस शाळेने ‘आयसीटी इनोव्हेशन चॅलेंज’ या विशेष विभागात पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेस वीस वर्षे पूर्ण झाली असून, यावर्षी स्पर्धेतील वरिष्ठ गटात व्ही. पी. मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलने, कनिष्ठ गटात डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने आणि सब ज्युनियर गटात डीएसके शाळेने बाजी मारली आहे. लहान गटात डॉ. कलमाडी शामराव हास्कूलच्या प्राथमिक गटाने पारितोषिक मिळवले आहे. विविध विभागांमध्ये चमकदार कामगिरी करत तब्बल १०६ विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.      

कलमाडी शाळेने १९९८ मध्ये ‘सायबर जिनियस’ ही आंतरशालेय स्पर्धा सुरू केली. यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच केले होते. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.चे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, फंडामेंटरचे संस्थापक संचालक अमोल पाटकर, ‘एमकेसीएल’चे वरिष्ठ महासंचालक उदय पंचपोर, असोसिएशन फॉर काँप्यूटिंग मशिनरीच्या (एसीएम इंडिया) ‘सीएस पाठशाला’ उपक्रमाचे प्रमुख विपुल शहा, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पल्लवी नाईक, शाळेच्या ‘इन्फॉर्मेशन कम्यूनिकेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख ज्योती ढोर तसेच कन्नड संघाचे व्यवस्थापकीय सदस्य या वेळी उपस्थित होते.

ही स्पर्धा तिसरी-चौथी, पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी इयत्ता अशा चार गटांमध्ये घेण्यात आली. पालिका शाळांमधील विद्यार्थी आणि विशेष मुलांसाठीही स्पर्धेत खास विभाग ठेवण्यात आला होता.

विवेक सावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘तंत्रज्ञान सर्वांच्या वापरासाठी अधिकाधिक खुले कसे करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी जरूर करावा. तंत्रज्ञानाच्या वापरातून विश्वाच्या समस्या सोडवता येऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या वापराच्या दृष्टीने सर्व ‘टीनएजर्स’नी ‘ग्रीनएजर’ व्हावे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link