Next
‘मेट्रो’संदर्भात गिरीश बापट यांची विशेष बैठक
प्रेस रिलीज
Friday, December 08, 2017 | 02:03 PM
15 0 0
Share this article:

गिरीश बापटपुणे : मेट्रोच्या कामांना अधिक गती देण्यासाठी मंत्रालयात आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवाजी नगर येथील गोदामांची जागा मेट्रोसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांना दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी, अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

शिवाजीनगर येथील गोदामाच्या जागेत मेट्रोचे मुख्य स्थानक उभारण्यात येणार आहे. यासाठी येथे असणारी धान्य गोदामे, सेतू सेवा केंद्र, पुरवठा विभागाची कार्यालये तसेच निवडणूक विभागाची गोदामे अन्यत्र हलवावी लागणार आहेत. ही गोदामे जिल्हा परिषदेची जुनी इमारत, पुणे स्टेशन, एसटी स्थानक आणि भोसरी क्षेत्रीय कार्यालय येथे हलवण्यात येणार आहेत.

ही कार्यालये स्थलांतरित करून या जागेचा ताबा दोन महिन्यांत मेट्रोला देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश बापट यांनी या वेळी दिले. त्यासाठी संबंधित यंत्रणांचे करारनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search