Next
‘महाराष्ट्र सर्वांत जास्त सौरऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनेल’
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 06:09 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘सौरऊर्जेचे महत्त्व महाराष्ट्राला पटले असून, आगामी काळात महाराष्ट्र हा सर्वांत जास्त सौरऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार आहे. सौरऊर्जेचे महत्त्व आणि किफायतशीरपणा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती निर्माण केली पाहिजे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केले.

इनो सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीने ‘सौरऊर्जा आणि इन्व्हर्टरमधील नवे तंत्रज्ञान’ या विषयावरील १४ जानेवारी २०१९ रोजी चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. हे चर्चासत्र मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅंड इंडस्ट्रीजच्या सुमंत मुळगावकर सभागृहात झाले.

या वेळी जर्मनीतील रेफूसोलचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन थिएरफेल्डर, रेफूसोलचे साउथ एशिया बिझनेस हेड हरप्रीत सिंग धीर, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, इनो सोलर एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेश जगताप उपस्थित होते. अश्विनी जगताप यांनी स्वागत केले.

‘इनो सोलर एनर्जी प्रामुख्याने एनर्जी सेव्हिंग आणि सोलर एनर्जीमध्ये कार्यरत आहे व रेफुसोल, जर्मनीबरोबर त्यांनी सेल्स आणि सर्व्हिसचा करार केला आहे. कंपनी पुण्यामध्ये अद्ययावत सर्व्हिस व टेस्ट सेंटर आस्थापित करणार आहे,’ अशी माहिती उन्मेश जगताप यांनी दिली.स्टिफन थिएरफेल्डर यांनी ‘रेफूसोल’ अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाने तयार झालेल्या इन्व्हर्टरची माहिती दिली. ते म्हणाले, ‘भारताला सौरऊर्जेचे वरदान असून, गुणवत्तापूर्ण जर्मन इन्व्हर्टर वापरले, तर या सौरऊर्जेचा परिणामकारक वापर भारतीयांचे जीवन बदलून टाकेल.’

हरप्रीत सिंग धीर म्हणाले, ‘सौरऊर्जेच्या दूरगामी वापरासाठी गुणवत्तेची हमी देणारी उत्पादने वापरणे हितकारक असते. त्यात तडजोड केली की नंतर ग्राहकालाच त्रास होतो.’

या चर्चसत्राला सौर ऊर्जा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rucha joshi About 33 Days ago
Very nice
0
0

Select Language
Share Link