Next
परदेशी रोटेरियन्सनी अनुभवले रत्नागिरीचे आदरातिथ्य
BOI
Friday, January 18, 2019 | 11:47 AM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रोटरी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे २५ सदस्य सध्या मोटरसायकलवरून मुंबई ते म्हैसूर प्रवास करत आहेत. भारतातील वारसा स्थळे आणि संस्कृती जवळून पाहणे हा त्यांचा उद्देश आहे. हा चमू १६ जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीत आला होता. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्यातर्फे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

या २५ जणांमध्ये आठ देशांतील १६ क्लबमधील सदस्यांचा समावेश आहे. विवेक हॉटेलमध्ये त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७०चे २०२०-२१चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, म्हैसूरचे मुरलीधर प्रभू, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, केतन चौधरी, रत्नागिरी क्लबचे अध्यक्ष मुकेश गुप्ता, जॉन नायंबरे, मिडटाउनचे अध्यक्ष दिगंबर मगदूम, सचिव प्रसाद खेडेकर उपस्थित होते. म्हैसूर क्लबतर्फे २०१७पासून हा उपक्रम राबवला जात आहे. 

या वेळी संग्राम पाटील यांनी रोटरीच्या कामाचा आढावा घेतला. भारतामध्ये सुरू असलेल्या कामांसाठी परदेशी रोटेरियन्स आणि क्लबनी सढळ हस्ते मदत द्यावी, असे आवाहन त्यांमी केले. रत्नागिरीत झालेल्या आदरातिथ्याने भारावल्याची प्रतिक्रिया परदेशी रोटेरियन्सनी व्यक्त केली.या वेळी रत्नागिरीतील सभासदांनी परदेशी रोटेरियन्सशी संवाद साधला. त्यानंतर फ्लॅग एक्स्चेंज कार्यक्रम झाला. १६ क्लबनी त्यांचा ध्वज रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष दिगंबर मगदूम यांच्याकडे दिला व रत्नागिरीचा ध्वज त्यांना देण्यात आला. त्यानंतर मिडटाउनचा तेरावा वर्धापनदिन केक कापून साजरा झाला. नवीन सदस्य वरद फडके यांचे स्वागत संग्राम पाटील यांनी केले. त्यानंतर दामले विद्यालयास वॉटर फिल्टर भेट देण्यात आला. सार्थ ग्रुपतर्फे मराठमोळी संस्कृती दाखवणारा नृत्याविष्कार सादर करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला रोटरी मिडटाउन व रत्नागिरी क्लबचे पदाधिकारी अॅ ड. विनय आंबुलकर, अॅवड. शाल्मली आंबुलकर, संजय पतंगे, जयंतीलाल जैन, प्रवीण लाड, संजीव सुर्वे, बिपिन गांधी, हिराकांत साळवी, केदार माणगावकर, प्रीतम भुते, समीर इंदुलकर, श्रुती आंबेरकर, संजय पाटोळे, वैभव साळवी, मंदार ढेकणे, धरमसीभाई चौहान, विनायक हातखंबकर उपस्थित होते. डॉ. दृष्टी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

परदेशी रोटेरियन्स :
फ्रँक व विनफ्रेड मिलनर, मायकेल ट्रेवर मिचेल (इंग्लंड), राज पटोली, रॉजर स्क्रँझ, मार्कस विडमर, उर्स एबी (स्वित्झर्लंड), मेरी व एच. यू. डब्ल्यू. अॅलडम्स (वॉलेस), मार्टिन विलन्स, लिलवूड एडवर्डस् (ऑस्ट्रेलिया), टॉर्बेजॉन (नॉर्वे), ऑट्टो रिव्हे (कॅनडा), पॅट्रिक वासर, हॅरी ब्रिग्ज, पीटर बॅरो, रिचर्ड अंडरवूड व जॅन सॅनफोर्ड (न्यूझीलंड), जॅमी एडवर्डस्, शेरी पोलिस, डेविड ग्रांट, सबीना टेलर (कॅनडा), अब्राहम झाचेरिस (भारत) हे रायडर्स या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search