Next
रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी बुवाची आषाढातील दुसरी ग्रामप्रदक्षिणा
BOI
Monday, July 29, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव २७ जुलैला उत्साहात झाला. श्री देव भैरीची पालखी सकाळी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर आली. आषाढ महिन्यातील ही दुसरी ग्रामप्रदक्षिणा भाविकांच्या उदंड गर्दीमध्ये पार पडली. 

शिमगोत्सवानंतर फक्त आषाढ महिन्यात भक्तांची ख्यालीखुशाली घेण्यासाठी भैरीबुवाची आषाढ शुक्ल दशमी व कृष्ण दशमीला ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. यात भैरी मंदिर देवस्थानचे ट्रस्टी, मानकरी, ग्रामस्थ मंडळी सहभागी झाले. मंदिरातून भैरीबुवाची पालखी बाहेर आणल्यानंतर ठरलेल्या मार्गावरून ती नेण्यात येते. भैरीबुवाला श्रीफळ देण्यासाठी अनेक भाविकांची मार्गावर गर्दी झाली.


आषाढ महिन्यात राखण म्हणून श्रीफळ देण्यासाठीही श्री देव भैरी मंदिरात दररोज अनेक भाविक येत असतात. श्रावण महिन्यातही मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावण प्रतिपदा ते अमावस्या या कालावधीत श्री तृणबिंदूकेश्‍वर मंदिरात संततधार रुद्रानुष्ठानचे आयोजन केले जाते.

ग्रामप्रदक्षिणेला निघालेली श्री देव भैरीची पालखी खालची आळी मार्गे मुरलीधर मंदिर, काँग्रेस भुवन, टिळक आळी, झाडगाव येथे पटवर्धन व सांवत (खोत) यांच्याकडे थांबून पुढे जोशी पाळंद मार्गे परटवणे येथे खंडकर खोत यांच्याकडे थांबली. त्यानंतर पुढे फगरवठार येथील लांजेकर कंपाउंडमधील सहाणेवर नेण्यात आली. पुढे अठरा हाताच्या गणपती मंदिर मार्गे फाटक हायस्कूल, गाडीतळ, गोखले नाका, मारुती आळी, तेलीआळी कोतवडेकर सहाणेवर थांबून परत मारुती आळीतून पर्‍याची आळी, धमालनीच्या पारावरून विठ्ठल मंदिर मार्गे, मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे भैरी मंदिरामध्ये नेण्यात येते. गार्‍हाणे होऊन रात्री ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रमाची सांगता होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search