Next
संजय भास्कर जोशी
BOI
Monday, May 14, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘आयडिया सेल्युलर’सारख्या कंपनीमधल्या असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंटसारख्या प्रतिष्ठेच्या पदावरून अचानक ऐन चाळिशीत निवृत्ती घेऊन, आपल्या सर्जनशील लेखनकलेला आणि पुस्तकप्रेमाला वाहून घेणारे संजय भास्कर जोशी यांचा १४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
१४ मे १९६३ रोजी जन्मलेले संजय भास्कर जोशी हे कथाकार, कादंबरीकार, उत्तम वक्ते आणि उत्तम पुस्तक विक्रेते अशा विविध पैलूंनी ओळखले जातात. त्यांनी स्वस्तिक, थरमॅक्स, टाटा हनीवेल, फिनोलेक्स यांसारख्या प्रथितयश कंपन्यांमधून आपल्या कॉर्पोरेट करिअरला आकार दिला. पुढच्या दहा वर्षांत ‘आयडिया सेल्युलर’सारख्या कंपनीमध्ये असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंटपद गाठून अचानक ऐन चाळिशीत त्यांनी निवृत्ती घेतली आणि आपल्या सर्जनशील लेखनकलेला आणि पुस्तकप्रेमाला वाहून घेतलं! त्या अनुभवांवर आधारित असलेलं त्यांचं ‘आहे कॉर्पोरेट तरी’ हे पुस्तक गाजलं होतं.

नावीन्यपूर्ण विषयांवरचं अत्यंत बांधीव लेखन हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. ‘नचिकेताचं उपाख्यान’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला ना. सी. फडके पुरस्कार मिळाला होता. 

काळजातील खोल घाव, रेणुका-मृणालची उपाख्याने, स्वप्नस्थ, श्रावणसोहळा, दी कॅचर इन दी राय अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, तसंच शब्द पुरस्कार मिळाला आहे.

सध्या ते लेखनाव्यातिरिक्त पुण्यात ‘पुस्तक पेठ’ नावाचं पुस्तकाचं दुकान चालवतात आणि पुस्तकविक्रीमध्ये मनापासून रस घेतात. 

(संजय भास्कर जोशी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

(मराठी भाषेबद्दल संजय भास्कर जोशी यांची मते जाणून घ्या सोबतच्या व्हिडिओतून...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link