Next
‘एसटीमध्ये महिला चालकांची भरती करणार’
प्रशांत सिनकर
Friday, March 08, 2019 | 05:58 PM
15 0 0
Share this story



ठाणे : ‘एसटीमध्ये महिला चालकांची मोठी भरती करण्यात येणार असून, महिलांनी यासाठी तयारी करावी,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात केले.

जागतिक महिला दिनानिमित्त खासदार राजन विचारे व नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या वतीने ठाण्यातील गोदूताई परुळेकर मैदानात ठाणे शहरातील अबोली महिला रिक्षा चालक व महिला बस कंडक्टर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी रावते यांच्या हस्ते सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा, तसेच ठाणे शहरातील अबोली महिला रिक्षा चालकांचा व  बस कंडक्टर महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 


येत्या काही दिवसांत महिलांसाठी एसटी चालक म्हणून मोठी भरती करण्यात येणार असून, महिलांनी त्यासाठी तयारी करावी; तसेच कॉलेजला जाणार्‍या मुलींना एसटीमध्ये मोफत पास मिळण्याची सोय करून देण्यात येणार असल्याचे रावते यांनी जाहीर केले. स्त्री शिक्षणाच्या पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचाही रावते यांनी आवर्जून उल्लेख केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत महिला सन्मानाचे बाळकडू आम्हाला शिवसेनाप्रमुखांमुळेच मिळाल्याचे रावतेंनी नमूद केले. खासदार राजन विचारे व नंदिनी विचारे यांनी उत्तम  कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link