Next
स्वातंत्र्यदिनी ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये वनप्रकल्पाचा शुभारंभ
प्रेस रिलीज
Saturday, August 18, 2018 | 04:21 PM
15 0 0
Share this article:

‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’मध्ये कर्नल के. टी. कुरिआकोस यांचे स्वागत करताना सोनु गुप्ता आणि भारती भागवाणी

पुणे :  स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी येथील ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये वनप्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ‘मॅन्यूफॅक्चरिंग ग्रुप ऑफ आर्मी बेस वर्कशॉप’चे उपमहाव्यवस्थापक कर्नल के. टी. कुरिआकोस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल’च्या सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी,  इतर शिक्षक आणि पालक या वेळी उपस्थित होते.  

शाळेच्याच परिसरात सहावी ते नववीच्या मुलांनी ५० झाडे लावून ‘वन प्रकल्पा’ची सुरुवात केली. येत्या काही महिन्यांमध्ये सातशेपेक्षा अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्याध्यापिका भारती भागवाणी यांनी सांगितले.

‘आपल्यामधील कौशल्यामुळे अनेक गोष्टी सहज साध्य करता येतात; पण त्यासोबत क्षमता वाढविणे, जोपासणे आणि त्याचा उपयोग समाजातील अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी कसा करता येईल हा विचार करणे आवश्यक आहे’,असे मत कुरिआकोस यांनी व्यक्त केले. ‘‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचे काय पैलू आहेत, येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची माहितीही या वेळी त्यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search