Next
महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन
BOI
Saturday, April 13, 2019 | 03:04 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महावीर जयंतीनिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने बुधवारी, १७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी आठ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, जैन समाजाचे चारही संप्रदाय, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज यांच्यासह विविध संस्था, मंडळे, महिला मंडळे यात सहभागी होणार आहेत. 

१९५२ पासून चारही संप्रदायाची एकत्रित मिरवणूक काढण्याची प्रथा असून, यंदाचे हे ६७ वे वर्ष आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोन्या मारुती चौकात महापौर, उपमहापौर, आयुक्त, विविध पक्षांचे अध्यक्ष, नगरसेवक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर शोभायात्रेचे स्वागत करतील.

या भव्य मिरवणुकीत भगवान महावीरांच्या जीवनावर आधारीत देखावे, रथ असतील;तसेच पाणी बचतीचा संदेश देणारे आणि मतदानाविषयी जागरुकता निर्माण करणारे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदान शिबीर, भोजन वाटप, आरोग्य तपासणी शिबीर चारा वाटप असे विविध उपक्रमही यानिमित्ताने राबवण्यात येणार आहेत’, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अचल जैन, सचिव अनिल गेल्डा, शरद शहा, सहसचिव विजय भंडारी आणि खजिनदार संपत जैन यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search