Next
‘माणुसकीची हत्या थांबवली पाहिजे’
युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, May 02, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘धर्माकडे वळणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्टया असुरक्षित असतात. वर्चस्ववादाच्या राजकारणातून दहशतवादी हल्ले होतात. मरणाचे दैवतीकरण, उदात्तीकरण होता कामा नये. गरीबी नष्ट केली नाही, तर मरण विकत घेणारे वाढतात. धर्माच्या नावाने होणारा वाह्यातपणा वाढू देता कामा नये. एकात्मता वाढवणारे उपक्रम वाढवले पाहिजे. भारतात आपण सजग राहिलो, तर सर्व जगासाठी उत्तर शोधू शकू. माणुसकीची हत्या थांबविली पाहिजे,’ असे प्रतिपादन युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निरपराधांना गांधी भवन येथे आयोजित सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी दी न्यू क्रिएशन्सचे सहसंस्थापक आणि दीपगृह संस्थेचे विश्वस्त आशिष जेम्स, जागतिक घडामोडींचे अभ्यासक प्रा. परिमल माया सुधाकर, संदीप बर्वे आणि गांधी भवनचे सचिव अन्वर राजन उपस्थित होते. डॉ. सप्तर्षी यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.  

‘आपले आणि आपले नसलेले’ असा भेदच दहशतवादाला प्रोत्साहन देतात. तरुण जिहादकडे आकृष्ट का होतात, याचा अभ्यास केला पाहिजे. मानवतेला प्रोत्साहन दिले पाहिजे,’ असे जेम्स यांनी केले. 

कट्टरवादाचे अस्तित्व दाखवण्यासाठी दहशतवादी हल्ले होतात, असे नाही, तर त्या मागचा उद्देश ओळखला पाहिजे. जिहादी तरुणांना आकृष्ट करणे, हाही दहशतवादी संघटनांचा उद्देश असतो. या हल्ल्यानंतर श्रीलंकेत बाहेरील देशांचा हस्तक्षेप वाढू शकतो, श्रीलंकेचे सरकार याकडे कसे पाहते, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. आत्मबलिदानाच्या वाटेवरील तरुणांना परत कसे वळवता येईल, याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रा. परिमल यांनी सांगितले.

‘या हल्ल्याने फक्त श्रीलंकेसमोरच नाही, तर जगातील मानवतावाद्यांसमोर आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा सर्वांगीण विचार करण्यासाठी ही सभा आयोजित केली,’ असे बर्वे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search