Next
‘एमजी मोटर’तर्फे व्यवसाय योजना जाहीर
प्रेस रिलीज
Tuesday, March 20, 2018 | 12:43 PM
15 0 0
Share this story

‘एमजी मोटर इंडिया’च्या बाजारपेठ योजनांबाबत माहिती देताना ‘एमजी मोटर इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाब्रा.मुंबई : एमजी मोटर इंडियाने (मॉरिस गॅरेजेस) भारतीय बाजारपेठेत त्यांच्या आक्रमक व्यवसाय योजनांची घोषणा केली. त्यांच्या हालोल येथील प्लांटचे उन्नतीकरणाने, ज्यात नवीन प्रेस शॉपचे बांधकाम आणि असेंब्ली आणि इतर सुविधांचा समावेश आहे, जलद गतीने प्रगती करत आहे; तसेच उच्च पातळीचे स्थानिकीकरण मिळवण्यासठी ‘एमजी मोटर’ने विविध सप्लायर्ससोबत बोलणी सुरू केली आहेत. ‘एमजी मोटर’ येत्या पाच ते सहा वर्षांत भारतीय बाजारपेठेत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

‘एमजी मोटर’ने त्यांच्या विक्रेता रोड शोसाठी विक्रेता संभावना आमंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. हा रोड शो मुंबईत २८ मार्च, दिल्ली येथे सहा एप्रिल आणि बेंगलोरमध्ये १६ एप्रिलला आयोजित केला जाणार आहे. कंपनी असे भागीदार शोधते आहे, ज्यांना प्रगतीची आस आहे, आणि ज्यांच्यामध्ये उद्योग मानक पार करणाऱ्या भिन्न मानदंडांची पूर्तता करण्याची क्षमता आहे आणि जे नवीन मानदंड करू शकतात.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘एमजी मोटर’ने जाहीर केले आहे, की भारतातील पहिले वाहन २०१९च्या दुसऱ्या तिमाहीत शेड्यूल सुरू होण्यापूर्वी सादर केले जाईल. त्यापुढे कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रत्येक नवीन उत्पादन सादर करण्याची योजना आखत आहे. त्यांच्या मूळ कंपनी एसएआयसीच्या (SAIC) अथक संशोधनामुळे, ‘एमजी मोटर’ नवीन ऊर्जा वाहने देण्याबाबत देखील सक्रियपणे विचार करत आहे आणि व्यावसायिकरित्या तंत्रज्ञान वापरण्यासाठी सर्व भागधारकांसोबत काम करण्याचा विचार करत आहे.

कंपनीच्या बाजारपेठ योजनांवर बोलताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाब्रा म्हणाले, ‘एमजीचा ब्रँड त्याच्या महान ब्रिटिश वारसाचा आनंद घेत असताना भविष्यातील अविश्वसनीय तंत्रज्ञानाचा स्वागत करतो. आम्ही आमच्या भारताच्या धोरणानुसार वेगाने पुढे जात आहोत आणि भविष्यात लोकांना आकर्षित करण्यासाठी एक मजबूत संघटना तयार करतो. आमचे उद्दिष्ट प्रिमियम इमेज आणि उत्कृष्ट मूल्य घेऊन आधुनिक आणि अगदी चालू काळातील वाहने प्रदान करणे आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link