Next
मुंबईत आयोजित ‘ॲम्युझमेंट एक्स्पो’ला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 03:02 PM
15 0 0
Share this article:

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘ॲम्युझमेंट एक्स्पो’चे उद्घाटन करताना मान्यवर.

मुंबई : ‘आयएएपीआय’च्या १९ व्या ‘ॲम्युझमेंट एक्स्पो’ या ॲम्युझमेंट आणि थीम पार्क बाजारपेठेतील खरेदीसाठी असलेल्या सर्वांत मोठ्या बी२बी प्रदर्शनाचे आयोजन मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सहा ते आठ मार्च २०१९ या कालावधीत भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून  ‘अतुल्य भारत’ अभियानांचे सहकार्य होते. मध्य प्रदेश पार्टनर स्टेट म्हणून होते.

या एक्स्पोमध्ये १४२हून अधिक प्रदर्शक हे भारतासह २० अन्य देशांतून सहभागी झाले होते. यात भारतासह बल्गेरिया, कॅनडा, चीन, दुबई-यूएई, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, इटली, कुवेत, लक्झम्बर्ग, फिलिपाइन्स, पोलंड, रशिया, स्पेन, स्वित्झर्लंड, थायलँड, दी नेदरलँड्स, टर्की, यूके आणि यूएसए आदींचा समावेश होता.

भारतीय ॲम्युझमेंट आणि थीम पार्क बाजारपेठ ही ३० टक्के ‘सीएजीआर’ने वाढली असून, ती २०२२पर्यंत सहा हजार २५० कोटींच्यावर (८८४ दशलक्ष यूएसडी) जाण्याची अपेक्षा आहे. या प्रदर्शनामध्ये प्रदर्शकांकडून ॲम्युझमेंट पार्क, थीम पार्क, वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क आणि इनडोअर ॲम्युझमेंट सेंटर्ससाठी लागणार्‍या राइड्स, उपकरणे आणि सेवा यांचे प्रदर्शन करण्यात आले. तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनाला ॲम्युझमेंट इंडस्ट्री, पार्क आणि आयएसी ऑपरेटर्स, हॉटेल आणि रिसॉर्ट्स, रिअल इस्टेट, मॉल विकासक, टुरिझम आणि मनोरंजन क्षेत्र, स्पोर्ट्स बार, कॅफेज, म्युझियम्स, सायन्स सेंटर्स, टुरिझम विकास बोर्डाचे सरकारी अधिकारी, पीडब्ल्यूडी, टाउन प्लानिंग, महानगर पालिका, स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी भेट दिली.

इंडियन असोसिएशन ऑफ ॲम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीजचे (आयएएपीआय) अध्यक्ष प्रदीप शर्मा म्हणाले, ‘प्रदर्शकांना राइड्स, आकर्षणे आणि अन्य मनोरंजनात्मक पर्याय शोधण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ असून, यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच हॉटेल, रिसॉर्ट्सच्या खोल्यांमध्ये अधिक लोक राहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतील. पर्यटन वाढल्याने रोजगार निर्मिती (कौशल्यपूर्ण आणि असंघटित) आणि त्याचबरोबर रेस्ट्रॉरंट्स, वाहतूक, रिटेल आणि स्थानिक कलांनाही प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.’   

या प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठेतील आघाडीच्या खेळाडूंबरोबर संवाद साधण्यासह अन्य कार्यक्रमांतून नवीन राइड्सचा शोध घेणे, आकर्षणे शोधणे, डीलर्सची निवड करणे, बिझनेस मॉडेल्स व फॉरमॅट्सचा शोध घेणे शक्य होणार आहे. कारण या नवीन फॉरमॅट्समुळे नवीन ॲम्युझमेंट पार्क आणि एन्टरटेन्मेंट झोन निर्माण करणे सोपे जाईल, कारण आजमितीस सामाजिक सुधारणेसाठी विशेषकरून मुलांसाठी आणि तरुणाईबरोबरच त्यांच्या कुटुंबांसाठी असे झोन निर्माण करणे महत्त्वपूर्ण आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search