Next
शिवाजी विद्यापीठातर्फे विदेशी भाषा अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सुरू
प्रेस रिलीज
Tuesday, July 02, 2019 | 06:18 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या रशियन, जर्मन, जपानी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची मुदत १० जुलै २०१९ आहे.

शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे एक वर्ष कालावधीचे रशियन, जर्मन, जपानी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येतात. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ५० इतकी आहे. यासाठी १२वी उत्तीर्ण किंवा समकक्ष अशी प्रवेश अर्हता आहे. दररोज सायंकाळी एक तास या प्रमाणे वर्ग असतात. उद्योग, पर्यटन, हॉटेल, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत विदेशी भाषा अवगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.

प्रवेश व अधिकच्या माहितीसाठी विदेशी भाषा विभाग, भाषा भवन येथे संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search