Next
‘डिजिटल बँकिंग सेवेचा वापर करावा’
प्रेस रिलीज
Wednesday, May 30 | 11:31 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘अनेक बँक कर्मचारी संघटनांनी ३० आणि ३१ मे २०१८ रोजी देशव्यापी संप पुकारला असल्याने या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांनी आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करावा आणि रोखीच्या व्यवहारांसाठी बँकेची एटीएम्स वापरावीत,’ असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांनी केले आहे.

महाबँकेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘३० आणि ३१ मे २०१८ या दिवशी अनेक बँक कर्मचारी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. यामुळे आमच्या बँकेच्या शाखांमधील दैनंदिन कामकाजामध्ये व्यत्यय येवू शकतो. म्हणूनच आमच्या ग्राहकांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय, महामोबाइल अॅप्लिकेशन आणि इंटरनेट बँकिंग सुविधा यांसारख्या डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करावा आणि रोखीच्या व्यवहारांसाठी बँकेची एटीएम्स वापरावीत. आमच्या ग्राहकांच्या सोयीसाठी आमच्या बँकेची एटीएम्स आणि डिजिटल बँकिंग प्रणाली सदैव उपलब्ध असेल, अशी तजवीज आम्ही केली आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link