Next
लीना जैन ‘सॅवी मिसेस इंडिया’ किताबची मानकरी
प्रेस रिलीज
Tuesday, July 30, 2019 | 01:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लीना जैन सॅवी मिसेस इंडियामध्ये ‘फिट अँड फॅब’  या किताबाच्या विजेत्या ठरल्या आहे. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. लीना यांनी यापूर्वी २००१मध्ये ‘बेस्ट कॉन्सिलर्स’, २०१०मध्ये ‘मिसेस स्वामिनी’, तर २०१८मध्ये ‘फेमिना मिसेस वायवेशीयेस स्टाइलिस्टा’ हा किताबही पटकाविला होता.

या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मिसेस इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. म्हणून हा किताब मी जिंकू शकले. मिसेस इंडियाचा किताब पटकावल्यापासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मला मॉडेलिंग व अभिनयासाठी बोलवणे होत आहे. लवकर मराठी किंवा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेन.’

लीना यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे मोलाचे योगदान राहिले असून, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सामाजिक कार्याची वसा जपला आहे. सध्या त्या ‘सर्टिफाइड किड्स फिटनेस ट्रेनर’ असून, लहान मुलांना तंदुरुस्तीसाठी त्या विशेष योगदान देतात. यापुढे ही त्या हे काम असे अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search