Next
ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : कोयना प्रकल्पग्रस्तांपैकी ज्यांना अद्याप जमिनीच्या मोबदल्यात जमीन मिळालेली नाही अशा सर्वांचे दावे तपासून घेऊन त्याबाबतचा अंतिम अहवाल ३१ जुलै २०१९पूर्वी तयार करण्याचा निर्णय राज्य पुनर्वसन प्राधिकरण व संनियंत्रण समितीच्या ठाणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन उपेंद्र तामोरे व सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला. 

भातसा येथील १०७ प्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंड देण्याबाबतची कार्यवाही ३० जूनपर्यंत पूर्ण करणे, कोयना पुनर्वसनातील काही जमिनी व वस्त्यांची शिल्लक राहिलेली फेरमोजणी १५ जुलैपूर्वी पूर्ण करणे, कोयना प्रकल्पग्रस्तांसाठीच्या चार वसाहतींमधील नळपाणी योजना १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे, अन्य काही वसाहतींमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करणे, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. 

या बैठकीला कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ च्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने अलीकडेच घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यात तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नार्वेकर व पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष भांडारी यांनी दिल्या. त्यानुसार आवश्यक ते आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search