Next
१०० ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करणाऱ्या संस्था, यंत्रणांचा सत्कार
रूबी हॉल क्लिनिकतर्फे विशेष कार्यक्रम
BOI
Saturday, September 14, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

१०० ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करणाऱ्या संस्थाच्या सत्कारप्रसंगी डॉ. के. व्यंकटेशम, सारंग आव्हाड, संजय दुलारे, जी. जी. भार्गव, डॉ. वाडिया, सुरेखा जोशी, आरती गोखले, डॉ. परवेझ ग्रांट, बोमी भोट, डॉ. पुजारी, डॉ. पठारे, डॉ. गुलाटी, डॉ. हिरेमठ आदी मान्यवर.

पुणे : पुणे शहराने नुकताच १०० ग्रीन कॉरिडॉर्सचा महत्त्वाचा टप्पा पार केला. यात अनेक संस्था आणि यंत्रणांचा महत्त्वाचा वाटा असून, रूबी हॉल क्लिनिकतर्फे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. 

कमलनयन बजाज कॅन्सर केअर सेंटर येथील आर. एस. वाडीया सभागृहात आयोजित या कार्यक्रमात वाहतूक पोलिस, झेडटीसीसी, पुणे विमानतळ, पत्रकार संघ आदी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्थांमधील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या वेळी पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, वाहतूक पोलिस विभागाचे माजी उपायुक्त सारंग आव्हाड, पुणे विमानतळाचे सहकामकाज सरव्यवस्थापक संजय दुलारे, पुणे विमानतळ येथील असिस्टंट कमांडंट ‘सीआयएसएस’ जी. जी. भार्गव, ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डॉ. एफ. एफ. वाडिया, ‘झेडटीसीसी’च्या समन्वयक आरती गोखले आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वयस्त डॉ. परवेझ ग्रांट, रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे, हदयरोगतज्ज्ञ डॉ. आर. बी. गुलाटी व डॉ. जगदीश हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते. 

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, ‘ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या महत्त्वाच्या कार्यामध्ये भूमिका बजावणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या सत्कारामुळे आमची जबाबदारी अजून वाढली आहे.’

‘झेडटीसीसी’च्या समन्वयक आरती गोखले यांनी आपले पोलिसांबरोबरचे अनुभव सांगितले. ‘ग्रीन कॉरिडॉरसाठी काम करत असताना शहर आणि ग्रामीण पोलिस या दोन्ही यंत्रणांसोबत संवाद साधावा लागतो आणि दोन्ही यंत्रणांचे ग्रीन कॉरिडॉरसाठी संपूर्णपणे समर्पित कार्य हे कौतुकास्पद आहे,’असे त्या म्हणाल्या.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी २०१५ मध्ये पहिला ग्रीन कॉरिडॉर तयार होत असताना न्यूजरूममधला आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘त्यावेळेस ग्रीन कॉरिडॉरबाबत फारसे कुणाला माहित नव्हते, परंतु कुणाला तरी यातून नवजीवन मिळणार असल्याने न्यूजरूममध्ये या बातमीने एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.’

रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वेस्त डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, ‘पुणे शहरासाठी १०० ग्रीन कॉरिडॉर हा एक महत्त्वाचा टप्पा असून, अवयव प्रत्यारोपणाबाबत भारतात पुणे आघाडीच्या शहरांपैकी एक आहे.’ 

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘ग्रीन कॉरिडॉरला लोकांकडून चांगले सहकार्य मिळाले असून, खऱ्या अर्थाने त्यांनी ही संकल्पना स्विकारली आहे. पोलिस आणि एअरपोर्ट यंत्रणा यांची यामध्ये अमूल्य भूमिका असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.’

डॉ. संजय पठारे यांनी सध्याच्या प्रत्यारोपणाच्या स्थितीबाबत सादरीकरण केले. डॉ. किशोर पुजारी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search