Next
‘भाजपने कुशल प्रशासक आणि संघटक गमावला’
दानवे यांनी अनंतकुमार यांना वाहिली श्रद्धांजली
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 03:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांच्या निधनाने आपल्याला धक्का बसला व तीव्र दुःख झाले. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाने एक कुशल प्रशासक, पक्ष संघटक आणि श्रेष्ठ संसदपटू गमावला आहे,’ अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी १२ नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली अर्पण केली.

दानवे म्हणाले, ‘अनंतकुमार यांनी तरुण वयातच सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. भाजप, कर्नाटकचे सचिव, प्रदेशाध्यक्ष, तसेच भाजपचे राष्ट्रीय सचिव, सरचिटणीस, भाजप पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य सचिव, भाजप केंद्रीय निवडणूक मंडळाचे सदस्य सचिव अशा अनेक पदांवर त्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी मोलाचे कार्य केले. ते कुशल संघटक होते. कर्नाटकमध्ये पक्षाचा पाया बळकट होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनंतकुमार यांनी मंत्रिपदाची जबाबदारी कुशलतेने पार पाडली. प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले व अंमलात आणले. २०१४ साली ते केंद्रीय रसायन व खतमंत्री झाल्यानंतर देशात युरियाच्या पुरवठ्यात चांगली सुधारणा झाली व शेतकऱ्यांना दरवर्षी भेडसावणारी युरियाच्या टंचाईची समस्या दूर झाली. ते सहावेळा लोकसभेवर निवडून गेले. ते उत्कृष्ट संसदपटू होते. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली.’

‘भाजप, महाराष्ट्रतर्फे आपण अनंतकुमार यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो,’ असे दानवे म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link