Next
‘नवनवीन उपक्रम आत्मसात करणे गरजेचे’
प्रेस रिलीज
Saturday, November 03, 2018 | 04:59 PM
15 0 0
Share this story

इचलकरंजी : ‘नवीन शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात महाविद्यालयांना गुणवत्ता टिकवायची असेल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलणारे आणि आधुनिक गुणवत्ता सुधारणारे नवनवीन उपक्रम आत्मसात करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील ‘एआयसीटीई’तील संशोधन, संस्था व प्राध्यापक विकास विभागाचे अ‍ॅडव्हाइसर प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.

येथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा व निधी संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

‘आज शिक्षणामध्ये लवचिकता असण्याची गरज आहे. केवळ चॉक आणि टॉक ही शिक्षण पद्धत चालणार नाही. शिक्षणामध्ये पारदर्शीपणा असण्याची अत्यंत गरज निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रकल्पाचे ज्ञान देण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विविध ज्ञानाचा मारा करण्याऐवजी ज्या विषयामध्ये संशोधनास विद्यार्थी उत्सुक असतील त्याबाबतच अधिक सखोल ज्ञान देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्टस आपल्या संस्थेत कार्यन्वित असणे ही काळाची गरज आहे,’ असे डॉ. मालखेडे यांनी नमूद केले.
 
‘भारत सरकारने ‘एआयसीटीई’च्या माध्यमातून टेक्निकल व प्रोफेशनल महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संशोधनास चालना मिळण्यासाठी अनेक नवनवीन प्रकल्पांची घोषणा केली आहे. यामध्ये उन्नत भारत, नॅशनल डॉक्टरेट फेलो पर्सन्यालिटी डेव्हलपमेंट, मॉडरॉब आदी अनेक योजना ‘एआयसीटीई’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यामध्ये विद्यार्थ्यी कल्याणासाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही योजना आहेत. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल डॉक्टरल फेलो योजना आहे. याशिवाय इनोव्हेट, पेटंट, प्रॉडक्स व पॉस्पर (आयपीपी) याद्वारे विद्यार्थ्यांना परदेशगमनाच्या संधी उपलब्ध आहेत. प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट, एसटीटीपी, रिसर्च फंडिंग प्रोग्रॅम, बुक रायटिंग, टीआरफ स्कीम अशा एकूण २८ योजनांची आहेत. क्युआयपी स्कीममध्ये १०५ आयपी सेंटरस कार्यन्वित असून, प्राध्यापकांना परदेशामध्ये पीएचडी करण्यासाठी क्युआयपीचा लाभ होऊ शकतो,’ अशी माहिती डॉ. मालखेडे यांनी दिली.

डीकेटीईमध्ये महाविद्यालयांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘एआयसीटीई’चे विविध प्रोजेक्टस यशस्वीरीत्या कार्यान्वित असून, येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेले जागतिकपातळीवर संशोधन व घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. डीकेटीईला ‘एआयसीटीई’ने ‘बेस्ट इंडस्ट्री-लिंक्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट’ हा देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने दोनदा सन्मानित केले असल्याचे डॉ. मालखेडे यांनी नमूद केले.  

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी मनोगतात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प आणि संशोधन यामुळेच डीकेटीईची गुणवत्ता सिद्ध झाल्याचे सांगितले. डे.डायरेक्टर प्रा डॉ. यु. जे. पाटील यांनी कार्यशाळेबाबत आढावा घेतला.

या कार्यक्रमास संस्थेचे सर्व विश्‍वस्थ, डे. डायरेक्टर डॉ. एल. एस. आडमुठे सर्व विभागप्रमुख, तसेच ‘एआयसीटीई’ रिजनल ऑफीसचे डी. आर. भगत, के. आर. शिवारामन यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक येथील इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, अर्किटेक्चरमधील नामांकित संस्थेतील प्राचार्य व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पहिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link