Next
‘वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक’
वंचित विकास संस्थेतर्फे ‘आपुलकी पुरस्कार’ प्रदान
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 04:32 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘सामाजिक काम करताना लोकांच्या मनातल्या गोष्टी आपण जाणून घ्यायला हव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांना, वंचितांना सक्षम करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते अझीम उर्फ राजू इनामदार यांनी व्यक्त केले.

जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे सुचिता सुरेश नाईक यांच्या स्मरणार्थ राजू इनामदार यांना उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते जयंत नातू यांच्या हस्ते ‘आपुलकी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या प्रसंगी विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर, स्वाती नातू, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका मीना कुर्लेकर व सुनीता जोगळेकर, डॉ. मधुसूदन घाणेकर, मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते.  

इनामदार म्हणाले, ‘वंचित विकास संस्थेप्रमाणेच आम्हीही वंचितांसाठी काम करतो. हा पुरस्कार म्हणजे आपल्या लोकांकडून मिळालेली कौतुकाची थाप आहे. अदृश्य स्वरूपाच्या कामांकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत; परंतु वंचित विकासने या गोष्टी जाणल्याबद्दल संस्थेचा आभारी आहे. काम करत असताना अनेक अडचणी येतात; परंतु यात लोकांचा सहभाग आणि मदत पाहून पुन्हा नवीन उर्मी मिळते. माणसाने मनाची नाती निर्माण करायला हवीत. बोललेले सगळ्यांनाच ऐकू येते; मात्र, न बोललेलेही आपल्याला ऐकता आले पाहिजे.’    

जयंत नातू म्हणाले, ‘पाठीवर मिळालेली शाबासकी ही कार्यकर्त्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. कुठलेही पाठबळ नसताना समाजातील विविध घटकांना आवश्यक वस्तू पुरवून त्यांना मदत करणे, त्यांच्यासाठी काम करुन त्यांना सक्षम बनविण्याचे महत्त्वपूर्ण काम राजू इनामदार करत आहेत. ही कौतुकाची बाब आहे.’

डॉ. कोहिनकर म्हणाले, ‘कोणतेही काम करण्यासाठी आर्थिक भांडवल खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला हवा. जमेल तेवढी मदत करायला हवी. निस्वार्थीपणे केलेल्या कामाला संस्थेने पुरस्काराच्या माध्यमातून कौतुकाची थाप मिळाली आहे.’

प्रास्ताविक मीना कुर्लेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन देवयानी गोंगले यांनी केले.

(राजू इनामदार यांची प्रेरणादायी गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वंचित विकास या संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search