Next
‘३बीएल’तर्फे प्रारंभिक मोसमासाठी खेळाडूंची यादी जाहीर
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 03:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘३x३ प्रो बास्केटबॉल लीग’ (३बीएल) या भारतातील पहिल्या ‘फिबा (FIBA) प्रमाणित’ लीगतर्फे प्रारंभिक मोसमासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. लीगतर्फे सराव सामन्यातून आणखी १५ भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आल्याचीही घोषणा झाली.

पहिल्या सराव चाचणी सामन्यामध्ये देशभरातून १०० हून अधिक बास्केटबॉल खेळाडूंना आपले प्रो-बास्केटबॉलचे स्वप्न सत्यात उतरविण्याची संधी मिळाली. प्रारंभिक मोसमाच्या माध्यमातून प्रो बास्केटबॉल लीगने भारतात ३x३ बास्केटबॉल रुजविण्याच्या आपल्या बांधिलकीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

सराव चाचणी दरम्यान संपूर्ण भारतभरातून खेळाडू सहभागी झाले. यामध्ये दिल्ली, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यातील खेळाडूंचे प्रमाण लक्षणीय होते. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या चाचणी सामन्यांच्या वेळी पलप्रीत सिंग ब्रार, इंदरबीर गिल, गुरविंदर सिंग आणि जगदीप सिंग अशा भारतातील काही आघाडीच्या बास्केटबॉल खेळाडूंनी देखील उपस्थित राहून अन्य खेळाडूंना खेळाबाबतची स्वतःची ऊर्जा आणि आवड यांना योग्य दिशा देऊन स्वतःसाठी व देशासाठी सन्मान मिळवण्यासाठी  प्रोत्साहन देण्याचे काम केले.

३x३ बास्केटबॉलच्या प्रारंभिक मोसमाच्या चाचणीबाबत बोलताना ‘३बीएल’चे लीग कमिशनर रोहित बक्षी म्हणाले, ‘या चाचणी सत्रादरम्यान आम्हाला गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता यांची जी पातळी पहावयास मिळाली ती अत्यंत स्पृहणीय आहे. भारतात ‘३x३ बीएल’ सादर करताना एक चाचणी आम्ही घेतली होती आणि हे दुसरे सत्र आत्ता पार पडले. त्यासाठी मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो होतो आणि संघांची अंतिम यादी पाहून अतिशय उत्साहित झालो आहोत. भारतीय ३x३ बास्केटबॉल खेळाडूमध्ये प्रचंड मोठी क्षमता असून, नजीकच्या काळात होणाऱ्या फिबा (FIBA) जागतिक दौरा, तसेच २०२० टोकियो ऑलिंपिकमध्ये ते चमकदार कामगिरी करून दाखवतील यात शंका नाही.’

‘या चाचणीला मिळालेला प्रतिसाद उदंड होता आणि भारतातील लोकांमध्ये ३x३ बास्केटबॉलबद्दल असलेला उत्साह पाहून आम्ही आनंदित झालो आहोत. या देशातील लोकांचा कल अगदी हळुवारपणे क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांकडे वळू लागला असून साऱ्या देशाला झपाटून टाकण्याची क्षमता बास्केटबॉल खेळामध्ये निश्चितच आहे,’ असे ‘३बीएल’चे विपणन प्रमुख सुधीर वशिष्ठ यांनी नमूद केले.

‘३x३ बास्केटबॉल हा भारतातील सर्वात नवीन असा खेळाचा प्रकार असून, त्यामध्ये भाग घेण्यासाठी खेळाडू मोठ्या संख्येने उत्सुक आहेत, ही खूपच समाधानाची बाब आहे. क्रीडा आणि मनोरंजन हे नेहमीच एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जातात, त्यामुळे या खेळाडूंना आणि लीगला अधिकाधिक प्रमाणात लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यश येईल याची आम्हाला खात्री वाटते,’ असे प्रतिपादन ‘३बीएल’चे मनोरंजन संचालक विवेक कृष्णा यांनी केले.

‘३बीएल’च्या प्रारंभिक मोसमात पलप्रीत सिंग ब्रारसारखे नामांकित भारतीय बास्केटबॉलपटू, तर बिक्रमजीत गिल, इंदरबीर सिंग गिल, लियान्ड्रो लिमा आणि अन्य कित्येक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धांच्या विजेत्यांना फिबा जागतिक दौऱ्यामध्ये (FIBA World Tour) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link