Next
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा पुण्यात
प्रेस रिलीज
Wednesday, January 23, 2019 | 02:34 PM
15 0 0
Share this story

नवी मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी डेहराडून (उत्तरांचल) येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयात इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा एक व दोन जून २०१९ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच असून, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय एक जानेवारी २०२० रोजी ११ वर्षे सहा महिन्यांपेक्षा कमी व १३ वर्षांपेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरतील.

विद्यार्थ्याचा जन्म दोन जानेवारी २००७ ते एक जुलै २००८ या कालावधीतील असावा; तसेच विद्यार्थी एक जानेवारी २०२०ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयता सातवी या वर्गात शिकत किंवा सातवी उत्तीर्ण असावा. परीक्षेसाठी विहित नमुन्यातीलच आवेदनपत्रे घ्यावयाची आहेत. विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती/जमातीसाठी ५५५ रुपये (जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे. हा ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच ‘कमांडंट, आर.आय.एम.सी. डेहराडून’ यांच्या नावे काढावा. ड्राफ्टवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बँक कोड नंबर ०१५७६) अशी नोंद करावी.

आवेदनपत्र, माहितीपत्र व मागील पाच वर्षांचे प्रश्नपत्रिका संच ड्राफ्ट पाठविल्यानंतर कॉलेजकडून पोस्टाने पाठविण्यात येतील. परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे ३१ मार्च २०१९ पर्यंत पोहचतील अशा प्रकारे स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जाऊन जमा करावीत. त्यानंतर आलेली आवेदनपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत. आवेदनपत्र दोन प्रतीत भरणे आवश्यक आहे व त्यासोबत जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत, जातीच्या दाखल्याची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) छायांकित एक प्रत, अधिवासी दाखल्याची सत्यप्रत (Domicile Certificate) जोडणे आवश्यक आहे; तसेच शाळेच्या बोनाफाइड सर्टिफिकेटची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.

परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी/हिंदी या भाषेत उपलब्ध होतील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती चार ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येतील.  

विहित नमुन्यातील आवेदनपत्र घेण्यासाठी पत्ता : कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तरांचल २४८ ००३
परिपूर्ण आवेदनपत्रे पाठविण्यासाठी पत्ता : आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे ४११ ००१
आवेदन पाठविण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च २०१९
अधिक माहितीसाठी संपर्क : (०२०) २६१२ ३०६६/६७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link