Next
‘महिंद्रा’च्या इगतपुरीतील प्रकल्पाचा गौरव
प्रेस रिलीज
Wednesday, December 05 | 03:46 PM
15 0 0
Share this story



इगतपुरी : महिंद्रा समूहाच्या इगतपुरी उत्पादन प्रकल्पाला भारतातील पहिला कार्बन न्युट्रल उत्पादन प्रकल्प म्हणून नुकतेच गौरवण्यात आले आहे. यामुळे ‘महिंद्रा’ने २०४० पर्यंत कार्बन न्युट्रल होण्याची बांधिलकी पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ब्युरो व्हेरिटास (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या टेस्टिंग, इन्स्पेक्शन अँड व्हेरिफकेशन (टीआयसी) क्षेत्रात जगातील आघाडीच्या कंपनीने  प्रकल्पाला प्रमाणित केले आहे.  
 
याबाबत बोलताना महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे चीफ मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स विजय कालरा म्हणाले, ‘कार्बन न्यूट्रल असे प्रमाणपत्र मिळणारा महिंद्रा समूहातील पहिलाच प्रकल्प आहे. ऊर्जेची बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर भर आणि रेसिड्युएल कार्बन शोषून घेण्यासाठी वृक्षलागवड यामुळे आम्हाला हे यश मिळवणे शक्य झाले.’



दी क्लायमेट ग्रुपच्या ‘ईपी १००’ कार्यक्रमासाठी स्वाक्षरी करून, २०३०पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याचे आश्वासन देणारी महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम) ही जगातील पहिली कंपनी होती. ऊर्जाबचत करणारी प्रकाशव्यवस्था, कार्यक्षम हीटिंग, व्हेंटिलेशन, अँड एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी), मोटर्स व हीट रिकव्हरी प्रकल्प यांचा अवलंब करून, ‘एमअँडएम’ने मुदतीच्या जवळजवळ १२ वर्षे अगोदर आपल्या ऑटोमोटिव्ह व्यवसायात ऊर्जा उत्पादकता दुप्पट केली आहे.

या यशाविषयी बोलताना सस्टेनेबिलिटी ऑफिसर अनिर्बन घोष म्हणाले, ‘कार्बन न्युट्रॅलिटीसाठी आम्ही जे काम करत आहोत, त्याद्वारे हवामानातील बदलाचे आव्हान पेलण्यासाठी मदत करत आहोतच, शिवाय आमच्या कामामुळे कार्यक्षमता, नाविन्य यामध्ये वाढ होत आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शाश्वततेसाठी योगदान दिले जात आहे.’

कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक उभी करण्यासाठी, उत्सर्जन केलेल्या प्रत्येक टन कार्बनसाठी १० डॉलरअंतर्गत कार्बन दर आकारणारीही ‘महिंद्रा’ ही पहिली भारतीय कंपनी होती. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि व्यवसायाने ऊर्जाक्षमता व अपारंपरिक ऊर्जा याबाबत ठरवलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी असलेल्या आवश्यकतेचे मूल्यमापन यानुसार काळजीपूर्वक दर ठरवण्यात आला.



कंपनीला कार्बन सिंक्स निर्माण करण्याचा १० वर्षांहून अधिक अनुभव आहे. यामुळेच कंपनीला हे यश साध्य करण्यासाठी मदत झाली. ‘एमअँडएम’ कार्बन न्युट्रॅलिटीची बांधिलकी पूर्ण करण्यासाठी, एन्व्हॉयर्नमेंटल डिफेन्स फंड (ईडीएफ) या कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीच्या बाबतीत गुणवत्ता वाढवण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांबरोबर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नॉन-प्रॉफिट संस्थेच्या मदतीने काम करणार आहे. कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करण्यासाठी कृती करत असताना, कंपनी ‘ईडीएफ’बरोबर आणि अन्य प्रमुख भागीदारांबरोबर यापुढेही काम करणार आहे.

‘एमअँडएम’नेही सायन्स बेस्ड टार्गेट्स उपक्रमावर स्वाक्षरी केली आहे. हा उपक्रम कंपन्यांना, ग्लोबल वॉर्मिंग प्री-इंडस्ट्रीअल पातळीवर दोन अंश सेल्सिअसखाली राखणे, या पॅरिस करारातील उद्देशानुसार उत्सर्जन कमी करण्यासाठी मार्ग दाखवणारा आहे. या सर्व बांधिलकींमुळे कंपनीला कार्बन न्युट्रॅलिटीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link