Next
माजी आमदार जवळगावकरांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा
नागेश शिंदे
Tuesday, June 04, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रमजान ईदीनिमित्त शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देऊन शुभेच्छा दिल्या. 

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन जून २०१९ रोजी हिमायतनगर येथील दारलुममध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रमजान ईद ही हिंदू-मुस्लीम बांधवांनी सलोखा कायम ठेवत साजरी करून हिमायतनगर शहराची एकतेची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. 


इफ्तार पार्टीनिमित्त काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश शिंदे, हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल, गोविंदाप्पा बंडेवार, संजय माने, माजी सभापती वामनराव वानखेडे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश वानखेडे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, अब्दुल बाकी हाजी अब्दुल करीमसाब, विजय सूर्यवंशी, फेरोज कुरेशी, सामाजिक संस्थेचे सचिव दिलीप राठोड, पत्रकार कानबा पोपलवार, परमेश्वर गोपतवाड, साईनाथ धोबे, परमेश्वर शिंदे यांच्यासह हिंदू-मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईफ्तार पार्टीच्या यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ यांनी परिश्रम घेतले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search