Next
पुण्यातील दोघेजण ‘वॉव’ पुरस्काराने सन्मानित
नेविल भास्करन यांच्या ‘बीस का लक’ या शॉर्ट फिल्मचाही गौरव
प्रेस रिलीज
Wednesday, January 02, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘ब्लिस इक्विटीतर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांचा दर वर्षी वर्थनेस बिझनेस अँड एज्युकेशन अॅवॉर्ड (वॉव पुरस्कार) देऊन सन्मान केला जातो. विविध क्षेत्रातील उद्योजक, कलाकार, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि राजकारणी यांसारख्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षी पुण्यातील तिघांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये सरीता राठी, आदित्य लोणारी, नेविल भास्करन यांच्या सामाजिक संदेश देणार्‍या ‘बीस का लक’ या शॉर्ट फिल्मचा समावेश होता,’ अशी माहिती सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

या पुरस्काराबाबत आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार संघ पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी सरिता राठी, आदित्य लोणारी, नेविल भास्करन उपस्थित होते. ‘वॉव’ पुरस्कार विविध श्रेणीत दिले जातात. यामध्ये सरिता राठी यांना ‘एज्युकेटिंग इंडिया’, आदित्य लोणारी यांना ‘महत्त्वाकांक्षी तरुण उद्योजक,’ तर ‘बीस का लक’ या शॉर्टफिल्मला ‘बेस्ट फिल्म ऑफ द इअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सरीता राठी यांनी अ‍ॅबॅकसच्या माध्यमातून अनुकरणीय कौशल्याद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शिक्षण सेवा दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००६पासून त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांना अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अ‍ॅबॅकसच्या प्रशिक्षणाने विद्यार्थी सक्रिय आणि समाजशील होत असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांनी आत्तापर्यंत ५००हून अधिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.  

आदित्य लोणारी हे एका शेतकर्‍याचा मुलगा असून, नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे त्यांचे छोटे गाव आहे. आपले गाव विकसित करण्याची त्यांची तीव्र इच्छा आणि दृढनिश्चय आहे. या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आणि स्वत:ची ‘स्कीव्हर आयटी सोल्युशन’ ही सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. आज या कंपनीच्या पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे शाखा आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांच्या पालकांना शिर्डीसारख्या छोट्याश्या गावात आनंदी जीवन जगता येत आहे. आदित्य यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रयत्न आणि समर्पण यामुळे आपण नशीब आजमावू शकत नाही यावर भाष्य करणारी शॉर्टफिल्म ‘बीस का लक’ ला या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. नशीबवान होण्याच्या संलग्न बाबींवर लक्ष केंद्रित केल्याने नशीबवान होता येत नाही, तर कठोर परिश्रम आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केल्याने नशीब आजमावता येते. आयुष्य जगण्यासाठी कोणतेही शॉर्टकटस् नाहीत, असा विचार या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून नेविल भास्करन यांनी मांडला आहे.

‘वॉव’ पुरस्काराने भारतात अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली आहे. ‘वॉव अॅवॉर्ड’ सन्मान समाजात आपले योगदान दाखवण्याची संधी देणारे हे व्यासपीठ आहे. शोभा आर्य या ‘ब्लिस इक्विटी’च्या संस्थापक आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link