Next
आत्मदीपो भव
BOI
Thursday, December 13, 2018 | 10:01 AM
15 0 0
Share this article:

‘आत्तदीपो भव’ म्हणजेच ‘आपणच व्हावे आपला दिवा’ ही शिकवण गौतम बुद्धांनी जगाला दिली, याचा आधार घेत गोव्यातील व्यावसायिक दत्ता दामोदर नायक यांनी प्रगत विचार व विकासासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्व विचार व्यवस्थापनशास्त्र या विषयीचे आधुनिक विचार ‘आत्मदीपो भव’तून व्यक्त केले आहेत.

संस्कारक्षम वयातील विद्यार्थी आणि व्यवस्थापनशास्त्राचा गंध नसलेल्या वाचकांसाठी हे पुस्तक सुलभ व सोप्या भाषेत लिहिले आहे. कष्टाविना, घाम गाळल्याशिवाय, बुद्धीचा वापर केल्याशिवाय श्रीमंत, सुखसंपन्न जीवनाकडे नेणारा कोणताही जादूचा दिवा नसतो, हे वास्तव यातून विविध कथांमधून ठसविले आहे. कोणावरही विसंबून राहू नये, नियती, दैव, विधिलिखित या गोष्टींवर विश्वास न ठेवता यश मिळवण्यासाठी प्रयत्नवाद, नियोजन, जटील प्रश्न सोडविण्यासाठी मानसिक ताकद व उत्तम प्रतिकारशक्ती, योग्य आहार, व्यायामाने तयार केलेले सुदृढ शरीर, प्रफुल्लित मनोवृत्ती, आशावादी व सकारात्मक दृष्टीकोन कसा असावा, याची सूत्रे गोष्टरूपाने व प्रत्यक्षातील घटनांचे उदाहरणे देऊन सांगितली आहेत.

पुस्तक : आत्मदीपो भव
लेखक : दत्ता नायक
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पाने : १६४
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search