Next
यूएस स्पेस कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना अंतराळवीरांसारखा अनुभव
पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा सहभाग
प्रेस रिलीज
Tuesday, April 30, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this article:


पुणे : हंटस्विले (अलबामा) यूएस स्पेस अ‍ॅंड रॉकेट सेंटर (यूएसएसआरसी) येथे सलग दोन आठवड्यांसाठी लीडरशिप प्रोग्राम आयोजित करण्यात आला. यामध्ये ४१ देशांतील २९२ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात १७ भारतीय विद्यार्थी असून, त्यातील आठ विद्यार्थी पुण्यातील होते. हनीवेल लीडरशीप चॅलेंज अ‍ॅकॅडमी (एचएलसीए) यांच्या वतीने ही संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. 

यंदाच्या वर्षी ‘हनीवेल’ने बेंगळुरूमधून सात, पुण्याचे आठ आणि दिल्ली-एनसीआर आणि हैदराबाद येथील प्रत्येकी एक विद्यार्थ्याची निवड केली. पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये आदित्य आनंद (दिल्ली पब्लिक स्कूल, पुणे), ऋचा बाचल (एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स), आरुषी बन्सल (दिल्ली पब्लिक स्कूल, पुणे), साक्षी भावसार (अरिहंत कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅंड सायन्स), अथर्व हडवले (एएसएमएस गीतामाता इंग्लिश आर्टस, कॉमर्स अ‍ॅंड सायन्स ज्युनिअर कॉलेज), स्तुती हेगडे (मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूल), सिद्धी खासनीस (फर्ग्युसन ज्युनिअर कॉलेज) आणि खुशी महाजन (डॉ. कलमाडी शामराव ज्युनिअर कॉलेज) यांचा समावेश होता. 

या प्रोग्राममध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (एसटीईएम) शिक्षणामधील नेतृत्व कौशल्ये रुजवण्यासाठी आताच्या घडीच्या कोडिंगमधील समस्या, कॉम्प्युटर सायन्स आणि अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स यांचा समावेश आहे.

आपल्या अनुभवाबाबत बोलताना पुण्यातील साक्षी भावसार म्हणाली, ‘अ‍ॅकॅडमीमध्ये मला फ्लाइट सिम्युलेटरच्या कॉकपिटमध्ये बसण्याची संधी मिळाली. जंबो जेट कसे उडवायचे याबद्दल शिकायला मिळाले. याचबरोबर मॉडेल रॉकेटदेखील लाँच केले. यापेक्षा अधिक रंजक काही असू शकते का? मी मंगळ ग्रहावरील अंतराळ मोहिमेचा (मार्स एक्सप्लोरेशन मिशन) एक भाग असल्यासारखेच मला वाटले.’

अथर्व हडवले

या अ‍ॅकॅडमी दरम्यान १६ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी रॉकेट डिझाइनिंग, कोडिंग, बिल्डिंग व टेस्टिंगमधील इंटरअ‍ॅक्टिव्ह व अनुभवात्मक सत्रे, सिम्युलेटेड अंतराळवीर प्रशिक्षण आणि शटल मिशन्स व मूनवॉकसारख्या आव्हानांमध्ये सहभागी होऊन सांघिक कार्याचे धडे घेतले. याचबरोबर विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक, अभियंते व माजी अंतराळवीरांशी भेट दिली ज्यांनी मूलभूत नेतृत्व क्षमतांची माहिती सांगण्यासोबतच त्यांचे प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव मांडले.

‘यूएससआरसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक डॉ. देबोरा बार्नहार्ट म्हणाले, ‘सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षणात पारंगत करणे तेवढेच महत्त्वाचे आहे जितके त्यांना लिहायला आणि वाचायला शिकविणे आवश्यक आहे. या युवा पिढीला प्रोत्साहन देऊन ‘हनीवेल’ या विद्यार्थ्यांना ग्लोबल स्टेम लिटरेट सिटीझन बनविण्याचे प्रयत्न करीत आहे, जे भविष्यात चांगले बदल घडवून आणू शकतात.’

ऋचा बाचल

यूएस स्पेस कॅम्पमध्ये अ‍ॅम्बेसिडर आणि मेंटॉर म्हणून निवड झालेल्या जगातील आठ विद्यार्थ्यांपैकी एक असलेला हैद्राबादचा रोहिथ तिरुमलेसेट्टी म्हणाला, ‘सगळ्यांनाच स्पेस कॅम्पला विद्यार्थी सल्लागार म्हणून परत येण्याची संधी मिळत नाही. स्पेस मिशनमध्ये परत सहभागी होऊन माझे स्वप्न अजून एकदा जगण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मागील वर्षाचा माझा अनुभव अद्वितीय होता. या वर्षी मला माझ्या मित्रांना काही माहिती सांगून त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत करता आली.’

हा माझ्यासाठीहा एक विलक्षण, मजेदार अनुभव होता ज्यामुळे मला आयुष्यभरासाठी शिकवण, आठवणी आणि मित्र मिळाले असलायचे पुण्यातील सिद्धी खासनीस हिने सांगितले. 

पुण्यातील अथर्व हडवले म्हणाला, ‘एचएलसीएमधील काळात मला माझ्यातील नेतृत्व कौशल्य व सांघिक कार्य विकसित करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली. जगभरातील लोकांना भेटण्याचे हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तज्ज्ञांकडून प्रेरणादायी मार्गदर्शन ते विविध उपक्रम व आव्हाने यांमुळे तंत्रज्ञानाविषयी मी नवीन शिकलो आणि या विषयात अधिक उत्सुकता निर्माण झाली.’

साक्षी भावसार

या कॅम्पने मला नेतृत्व कौशल्य शिकविले आहे, ज्याचा मला भविष्यात फायदा होईल. याचबरोबर या कॅम्पने माझ्या जीवनात स्वावलंबनाची भावना जागृत केली असल्याचे बेंगळुरूचा श्रीकार देसू यांनी सांगितले. ‘रॉकेट्स, जेट्स, स्पेस शटल्स आणि मूनवॉक याबद्दल आवड असणार्‍या जगभरातील विद्यार्थ्यांना भेटण्याचा अनुभव अत्यंत रोमांचक होता. या प्रोग्राममुळे विज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्याबरोबरच मौजमजा आणि आयुष्यभराची मैत्री मिळाली,’ असे गुरगांव येथील तन्मय तनेजा याने सांगितले. 

हनीवेल होम टाउन सोल्युशन्सचे अध्यक्ष माइक बेनेट म्हणाले, ‘जगभरात सॉफ्टवेअर आणि इंडस्ट्रीयल टेक्नोलॉजीमध्ये अग्रगण्य असलेली हनीवेल कंपनी तांत्रिक ज्ञान, सांघिक कार्य आणि नेतृत्व कौशल्य यांचा मेळ घालून विद्यार्थ्यांसाठी अधिक शैक्षणिक संधींची आवश्यकता ओळखते. ‘युएसएसआरसी’च्या सहयोगाने भावी नेतृत्व करणार्‍यांना हा प्रोग्राम प्रदान करण्यास आम्हाला आनंद होत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search