Next
‘दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरवाव्यात’
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सूचना
BOI
Wednesday, March 20, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, याची खात्री करा’, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत दिली.
 
या वेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्या.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हानिहाय निवडणूक तयारीचा आढावा घेतला. बैठकीत निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांची माहिती, जिल्हा प्रशासनाची तयारी त्यांनी जाणून घेतली. 

‘‘एकही मतदार सुटता कामा नये,’ हे यंदाच्या निवडणुकीचे ब्रीदवाक्य आहे. सर्व पात्र मतदारांबाबत विशेषत: दिव्यांग मतदारांबाबत अधिक काळजी बाळगावी. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प आदी सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक काळात दारुचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, याकडे लक्ष वेधून, डॉ. म्है‍सेकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी जागरुक राहून कारवाई करावी, असे सांगितले. ‘भरारी पथकासह इतर पथकांमध्ये समन्वय ठेवावा;तसेच मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटबाबत पोलीस विभागासह सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करावी, शंकानिरसन करावे,’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

‘सी-व्हीजील अॅपवर येणाऱ्या तक्रारींबाबत ताबडतोब कार्यवाही करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आदेश मिळाल्यावर कार्यवाही करण्यापेक्षा सक्रिय राहून कार्यवाही करावी,’ असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केंद्र आणि राज्यशासनाच्या सर्वच विभागांना आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले. 

‘आदर्श आचारसंहिता देशभर लागू असून, रेल्वे, डाक विभाग, कृषी, बँका यांच्यासह शासकीय-निमशासकीय संस्थांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कार्यवाही होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search