Next
‘हायर’तर्फे पहिली मोफत फेज डिटेक्टर सेवा
प्रेस रिलीज
Monday, September 24, 2018 | 02:23 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गृहोपयोगी उपकरणे व ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या हायर इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी या क्षेत्रातील पहिल्याच फेस डिटेक्टर सेवेचा शुभारंभ केला.

ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या बांधिलकीला बळकटी देत ‘हायर’ने भारतभरात ग्राहकांसाठी फेज डिटेक्टरस सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ‘हायर’ ग्राहक त्यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे उपकरण बसवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी हायर इंजिनीअर आल्यास त्याच्याकडून घरातील इलेक्ट्रिक फेज मोफत तपासून घेऊ शकतात. आजघडीला बहुतांश भारतीय घरांमध्ये इलेक्ट्रिकल ग्राउंडिंगचा प्रश्न भेडसावत आहे. ही समस्या ग्राहकांसाठी मोठा धोका ठरू शकते, हे लक्षात घेऊनच ही मूल्यवर्धित सेवा सादर करण्यात आली आहे.

ग्राहकांना व्यवसायाच्या केंद्रस्थानी ठेवत ‘हायर’ने अगदी सेवापश्चातही उत्कृष्ट अनुभव देण्याचा सक्रिय प्रयत्न केला आहे. या ब्रँडने देशभरातील सर्व्हिस सेंटर्स, २४x७ टोल फ्री हेल्पलाइन, डॉ. फिडो लाइव्ह चॅट पर्याय, मोबाइल सर्व्हिस व्हॅन, क्वॉलिटी एसी इन्स्टॉलेशन सेवा आणि नुकतीच सादर झालेली इलेक्ट्रिक फेज डिटेक्शन सर्व्हिस अशा, या क्षेत्रात नवे मापदंड स्थापन करणाऱ्या सेवा सादर केल्या आहेत. ग्राहकांना तात्काळ दर्जेदार सेवासाह्य देण्यासाठी ‘हायर’ने कायमच आपल्या ग्राहक सेवा उपक्रमांमध्ये वृद्धी आणि वाढ केली आहे.

या उपक्रमाबद्दल हायर अप्लायन्सेसचे (इंडिया) अध्यक्ष एरिक ब्रॅगँझा म्हणाले, ‘हायरमध्ये आमचे ग्राहक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या समाधानाची खातरजमा करणे हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे आहे. आमची नवी फेज डिटेक्टर सेवा हा या क्षेत्रातील पहिलाच असा उपक्रम आहे. ही सेवा अत्यंत ग्राहककेंद्री आणि खास भारतीय बाजारपेठेसाठी तयार करण्यात आली आहे. आमची ग्राहकसेवा ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि या प्रवासात सेवा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्कृष्ट ग्राहकानुभव प्रवास निर्माण करणे आणि या क्षेत्रात सेवेच्या नव्या व्याख्या निर्माण करणारे अशी ओळख बनवण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल म्हणजे नव्याने सुरू केलेली ही सेवा.’

आजच्या घडीला आपल्या बळकट सेवाजाळ्याच्या माध्यमातून ‘हायर’ आपल्या ग्राहकांना परिणामकारक आणि वेगवान पर्याय देत आहे. भारतातील १९ हजारांहून अधिक पिनकोड्सवर असलेल्या हायर एक्स्लुसिव्ह सर्व्हिस सेंटर्स (ईएससीज), ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटर्स (एएससीज) आणि डायरेक्ट सर्व्हिस सेंटर्ससह (डीएससीज) ४५० हून अधिक सर्व्हिस सेंटर्ससह ‘हायर’ने देशभरात व्यापक प्रमाणावर आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

सर्व्हिस सेंटर्सना भेट देणे शक्य नसणाऱ्या ग्राहकांसाठी ‘हायर’तर्फे मोबाइल सर्व्हिस व्हॅनच्या माध्यमातून डोअर टू डोअर सर्व्हिसही दिली जाते. ग्राहक आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि आपल्या प्रश्नांवर तत्काळ उत्तरे शोधण्यासाठी कधीही टोल फ्री हेल्पलाइनच्या माध्यमातून किंवा हायर इंडिया वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डॉ. फिडो लाइव्ह चॅट सुविधेच्या माध्यमातूनही हायरशी संपर्क साधू शकतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search