Next
पुणे मराठी ग्रंथालयाचे आपटे, बेहेरे, शारंगपाणी पुरस्कार जाहीर
BOI
Friday, January 04 | 03:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या कै. ना. ह. आपटे व कै. ना. के. बेहेरे आणि कै. मधुसूदन शारंगपाणी या पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. राजेंद्र खेर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (८ जानेवारी) सायंकाळी साडे सहा वाजता संस्थेच्या ‘केशव’ सभागृहात आयोजित समारंभात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.   

पुणे मराठी ग्रंथालयातर्फे प्रतिवर्षी या सुप्रसिद्ध लेखकांच्या स्मरणार्थ आशयपूर्ण पुस्तकांना रोख पुरस्कार दिला जातो. पुरस्कारांची रक्कम प्रत्येकी पाच हजार रुपये अशी असून, त्यासोबत स्मृतिचिन्ह दिले जाते. यंदा कै. ना. ह. आपटे पुरस्कार रविकिरण साने व निलिमा साने यांनी अनुवादित केलेल्या ‘२००२ गुजरात दंगली’ या पुस्तकास तर कै. ना. के. बेहेरे डॉ. योगेंद्र नेरकर लिखित ‘जागतिक अन्न पुरस्कार विजेत्यांची कर्तृत्वगाथा’ या पुस्तकास जाहीर करण्यात आला आहे. 

तसेच यंदा कै. मधुसूदन मुकुंद शारंगपाणी पुरस्कार उज्ज्वला गोखले यांनी अनुवादित केलेल्या ‘रेझोनान्स’ या पुस्तकास जाहीर करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link