Next
मोहोळ येथे जागतिक अन्न दिन साजरा
BOI
Friday, October 19, 2018 | 11:49 AM
15 0 0
Share this article:

सोलापूर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि पुणे येथील स्वयं शिक्षण प्रयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी मोहोळ कृषी विज्ञान केंद्रात जागतिक अन्न दिन आणि अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक विजयकुमार बरबडे, योगेश देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी नसरीन मुजावर, प्रकल्प अधिकारी, स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे किरण माने उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी जागतिक अन्न दिन आणि अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळा आयोजनाविषयी माहिती दिली; तसेच ग्रामीण युवक आणि महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा सल्ला त्यांनी दिला.

‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक बरबडे यांनी अन्न प्रक्रिया उद्योगास सद्यस्थितीत वाव असल्याचे सांगून कृषी विज्ञान केंद्र ‘आत्मा’च्या सहयोगाने कृषी उद्योजक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तांत्रिक सत्रात योगेश देशमुख यांनी ‘अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नोंदणी व परवाना आणि अन्न सुरक्षा’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. नसरिन मुजावर यांनी प्रक्रियायुक्त पदार्थांना भरपूर सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.  

या वेळी क्षीरसागर यांनी आरोग्यदायी पोषण परसबाग संकल्पना आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, पॅकेजिंग व गुणवत्ता नियंत्रण या विषयावर सखोल माहिती दिली.

अध्यक्षीय भाषण करताना डॉ. वळकुंडे म्हणाले, ‘महिला बचत गट अनेक वस्तू व पदार्थ गुणवत्ता पूरक बनवतात. बाजारपेठेतील मागणीनुसार त्यांचे उत्पादन घेऊन व्यावसायिकदृष्ट्या मार्केटिंग करणे गरजेचे आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिला बचत गटांनी आणि युवकांनी आर्थिक स्वावलंबनासाठी तांत्रिक सल्याचा लाभ घ्यावा.’

या वेळी पोषण परसबाग कृती प्रात्यक्षिकाचे आयोजन करून तांत्रिक बाबींविषयी विस्तृत माहिती देण्यात आली; तसेच कार्यक्रम स्थळी महिला बचत गटांमार्फत आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रोत्साहित अन्न प्रक्रिया उद्योजकामार्फत उत्पादित खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर, विषय विशेषज्ञ काजल जाधव, विषय विशेषज्ञ प्रा. किरण जाधव, कार्यक्रम सहाय्यक तुषार अहिरे, नंदकिशोर तांदळे, नितीन बागल, अरुण गांगोडे,  काका अडसुळे, रेश्मा राऊत आदींनी प्रयत्न केले. या कार्यशाळेला युवक, महिला बचत गट सदस्या तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search