Next
‘सँडविक कोरोमंट’च्या नवीन केंद्राचे पुण्यात उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 01:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : सॅंडविक कोरोमंट इंडियाने उत्पादकता, अॅप्लिकेशन, मशिनिंग आणि उत्पादनातील संशोधन यासाठी आपल्या पहिल्या जागतिक बैठक केंद्राचे उद्घाटन पुणे येथे नुकतेच केले. सॅंडविक कोरोमंटच्या आजवरच्या पोर्टफोलिओमध्ये अशा प्रकारची केवळ सहा केंद्रे असून, पुण्यातील हे केंद्र १८ हजार चौरस फूटांच्या भव्य जागेत थाटण्यात आले आहे.

या केंद्रासाठी ३५ मिलियन एसईके (२७ कोटी रुपये) इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनमधील लॅंगफॅंग, यूएसएमधील शाऊमबर्ग, मेक्सिकोतील क्वेरेटारो, यूएसएतील फेअर लॉन आणि स्विडनमधील सॅंडविकन ही कंपनीची अन्य केंद्रे आहेत.

सॅंडविक कोरोमंट इंडियाचे अध्यक्ष झेवियर गुएरा म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक सोल्यूशन्स आणि तज्ञता बहाल करण्याच्या आमच्या परंपरेत आता पुणे शहरातील जागतिक दर्जाच्या सॅंडविक कोरोमंट केंद्राची भर पडली असल्याचे जाहीर करताना मला फार आनंद होतो आहे. उत्पादकता नफा, अत्याधुनिक संशोधन व जागतिक उत्पादन क्षेत्राचे भवितव्य यात रुची असणाऱ्या प्रत्येकासाठी या केंद्रातून उत्कृष्ट सेवा उपलब्ध होणार आहेत.’

भारतीय उत्पादन क्षेत्रातील संशोधन व क्षमता याबाबतचे कंपनीचे जागतिक स्थान पुण्यातील सॅंडविक कोरोमंट केंद्राच्या माध्यमातून अधिक मजबूत होणार आहे. अत्यंत आधुनिक आणि प्रेरणादायी वातावरणात, भौतिक व डिजिटल भागीदारीला प्रोत्साहन देत उद्योजक परस्परांशी संवाद साधू शकतील, असे हे केंद्र म्हणजे विशेष बैठक ठिकाण आहे.

इनोव्हेशन कॉनक्लेव्ह २०१८मध्ये सॅंडविक कोरोमंटच्या पुणे येथील केंद्रात भारतभरातून दोन हजारांहून अधिक लोक आकर्षित होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येथे येणाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने, अभियांत्रिकी क्षमता आणि कस्टमाइज्ड सोल्यूशन्सचा या सेवांचा लाभ घेता येणार आहे. जगातील अन्य केंद्रांशीही ते जोडले जाणार आहे.

या व्यतिरिक्त, विविध प्रशिक्षण उपक्रमांमध्येही सहभागी होण्याची संधी या केंद्राद्वारे देण्यात येणार आहे. दर वर्षी या उपक्रमांतर्गत सॅंडविक कोरोमंटतर्फे ३० हजार व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाते. येथील नव्या केंद्रात डिजिटल लाइव्ह मशिनिंग (डीएलएम) हे दूरस्थ ठिकाणांना लाइव्ह मशीन प्रात्यक्षिकाद्वारे (क्लाउडच्या माध्यमातून) जोडणारे व्यासपीठही उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link