Next
‘सोलापूर फेस्ट’चे पुण्यात उद्घाटन
BOI
Friday, November 16, 2018 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

‘सोलापूर फेस्ट’प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, शोभा बनशेट्टी, गुरु बाबामहाराज अवसेकर, सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय शिंदे आदी मान्यवर.

पुणे : चादरी, कापड, शेंगदाण्याची चटणी अशा विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सोलापुरातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, कपडे, सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी पुणेकरांना ‘सोलापूर फेस्ट’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. येथील पंडित फार्म्स येथे भरलेल्या या प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि.१६) उद्घाटन महाराष्ट्राचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, गुरु बाबामहाराज अवसेकर, सोलापूर जिल्हापरिषदेचे अध्यक्ष आणि सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. 


‘सोलापूर सोशल फाऊंडेशन’तर्फे सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व प्रगती यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यापैकी हा एक उपक्रम आहे. हे प्रदर्शन १८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, प्रदर्शनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. शुभारंभाच्या दिवशी संध्याकाळी हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम ‘हास्यकल्लोळ’ होणार आहे. शनिवारी, दि.१७ रोजी संध्याकाळी सामुदायिक अग्निहोत्र व त्यानंतर लोकसंगीत, रविवारी, दि. १८ रोजी ‘पहाटगाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठीही येथे विशेष विभाग आहे. नागरिकांना येथे सोलापूरची खाद्यसंस्कृती अनुभवण्यासह खरेदीचाही मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search