Next
पंढरपूरचे डॉ. प्रशांत निकम फेलोशिप घेऊन जर्मनीला
BOI
Monday, April 16, 2018 | 05:32 PM
15 0 0
Share this story

डॉ. प्रशांत निकमसोलापूर : पंढरपूर येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत निकम यांना सांधेरोपणातील प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ट्रायालेक्ट या संस्थेची फेलोशिप जाहिर झाली आहे. त्यासाठी ते जर्मनीला रवाना झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून डॉ. निकम यांची निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मूळचे रोपळे (ता. पंढरपूर) येथील असलेल्या डॉ. निकम यांचे शिक्षण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत झाले. अशा परिस्थितीत त्यांनी काही काळ पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सन २०१०मध्ये निकम अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर नावाने पंढरपुरात हॉस्पिटल सुरू केले. या हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेली सांधेरोपण शस्त्रक्रिया पंढरपुरातील पहिली ठरली. आता सांधेरोपणातील पदवी अभ्यासक्रमासाठी त्यांना फेलोशिप मिळाली आहे. त्याअंतर्गत ते जर्मनीतील क्रेसक्लिनीकम या हॉस्पिटलमध्ये सहा एप्रिल ते सहा मे या एक महिन्याच्या कालावधीत सांधेरोपणातील प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करणार आहेत.

‘रुग्णांमध्ये आजही सांधेरोपणाविषयी अज्ञान आहे. त्यातच डॉक्टरांवरील विश्वास कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत सांधेरोपणातील अभ्यासक्रमासाठी मिळालेली फेलोशिप ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. सांधेरोपणातील प्रगत तंत्रज्ञानामुळे पंढरपूरसारख्या निमशहरी भागातील रुग्णांना दिलासा देता येऊ शकेल,’ असा विश्वास डॉ. निकम यांनी व्यक्त केला. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.Kishor Gaikwad About 335 Days ago
Best of wishesh in future life
0
0
Jayashree bhakare About 335 Days ago
We realy proud of you.Joint replacemwnr is need of pandharpur
0
0

Select Language
Share Link