Next
सोनोपंत दांडेकर
BOI
Friday, April 20 | 03:45 AM
15 0 0
Share this story

सार्थ ज्ञानेश्वरी म्हटलं, की सोनोपंत दांडेकर हे नाव प्रामुख्याने डोळ्यांसमोर येतं. २० एप्रिल हा त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
.........
२० एप्रिल १८९६ रोजी जन्मलेले शंकर वामन ऊर्फ सोनोपंत ऊर्फ सोनूमामा दांडेकर हे तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक, तसंच संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते. कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करून आधुनिक शिक्षितांची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवण्याचं महत्त्वाचं आणि कठीण काम त्यांनी केलं.

भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि दासबोध या विषयावर त्यांनी वेळोवेळी सुंदर प्रवचनं दिली होती. ज्ञानेश्वरीवर ते अधिकारवाणीने करत असलेली प्रवचने विशेष लोकप्रिय होती.  

तीन प्रवचने, तुकाराम गाथा, दैनिक स्वाध्याय, धुंडामहाराज देगलूरकर श्री ज्ञानेश्वरी सेवा गौरवग्रंथ, भारतातील थोर स्त्रिया, वारकरी जीवन, वारकरी पंथाचा इतिहास, वारकरी भजन संग्रह, श्रीमद्भगवद्गीता, सटीप ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी, साक्षात्कारपथावर तुकाराम, सोनोपंत दांडेकर यांची प्रवचने, सौंदर्याचे व्याकरण, ज्ञानदेव आणि प्लेटो, श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा कोश, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

नऊ जुलै १९६८ रोजी त्यांचं निधन झालं. 

(सोनोपंत दांडेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link