Next
‘एंड्युरन्स’चा ‘बीईई’तर्फे गौरव
प्रेस रिलीज
Monday, December 18 | 05:01 PM
15 0 0
Share this story

पुणे : एंड्युरन्स टेक्नालॉजिज लिमिटेडला  (ईटीएल) केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ऑटोमोबाइल (अँकिलरी) क्षेत्रातील ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीतर्फे (बीईई) नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड, २०१७मधील ‘फर्स्ट प्राइज’ने गौरवण्यात आले. बीईईने १४ डिसेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डेमध्ये हा सन्मान करण्यात आला.

ईटीएलने ‘इनरकॉन’ या प्रकल्पांतर्गत भारतातील सर्व प्रकल्पांमध्ये ऊर्जा संवर्धनानचे उपाय केले आहेत. या उपायांची अंमलबजावणी केल्याने ईटीएलसाठी ऊर्जेसाठीचा खर्च कमी झाला आहे.

‘एंड्युरन्स’ ही एक आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक असून, भारतात व युरोपात (जर्मनी व इटली) कार्यरत आहे व कंपनीची तंत्रज्ञानावर आधारित अनेक उत्पादने आहेत. ही प्रामुख्याने टू व थ्री व्हीलर ‘ओईएम’ना सेवा देत असून, कंपनीच्या उत्पादनांमध्ये अल्युमिनिअम कास्टिंग्स, सस्पेन्शन्स, ट्रान्समिशन व ब्रेकिंग सिस्टीम्स यांचा समावेश आहे.

‘एंड्युरन्स’ ही परिपूर्ण सेवा देणारी कंपनी असून, संकल्पनेपासून एंड युजरना डिलेव्हरी देण्यापर्यंत सर्व सेवा ग्राहकांना देत आहे व रिप्लेसमेंट क्षेत्रातही कार्यरत आहे. भारत, जर्मनी व इटली येथे कंपनीचे २६ प्रकल्प आहेत. त्यांपैकी १८ प्रकल्प भारतात आहेत. तीन प्रकल्प जर्मनीत, तर पाच इटलीत आहेत. याबरोबरच, कंपनीच्या भारतात दोन इन-हाउस टूल रूम्स आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link