Next
होंडातर्फे पुणे पोलिस दलाला शंभर मोटारसायकली प्रदान
BOI
Saturday, March 30, 2019 | 04:32 PM
15 0 0
Share this article:

पोलिस आयुक्त के. वेंकटेशम व होंडा मोटरसायकलचे हरभजन सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे पोलिस विभागाला शंभर अत्याधुनिक ‘होंडा लिव्हो’ मोटरसायकली भेट देण्यात आल्या.

पुणे : कायदा व सुव्यवस्था राखून सुरक्षेला चालना देण्यासाठी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) ‘बीट मार्शल्स’ या पुणे पोलिस विभागाच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ला (क्यूआरटी) शंभर अत्याधुनिक ‘होंडा लिव्हो’ मोटरसायकली भेट दिल्या. 

पुण्याचे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम व होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे जनरल अँड कॉर्पोरेट अफेअर्स संचालक हरभजन सिंग यांच्यासह राज्य सरकार व पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोटरसायकल देण्यात आल्या.


पुणे पोलिसांच्या कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमामध्ये योगदान देण्यासाठी होंडाने सामाजिक जबाबदारी अंतर्गत होंडाने पुणे पोलिसांबरोबर परस्पर सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीतर्फे बीट मार्शल्सना रिव्हॉल्व्हिंग फ्लॅशर्स व ब्लिंकर्स, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, सायरन्स, फ्लॅश लाइट्स अशा आधुनिक पोलिस अॅक्सेसरीज असणाऱ्या मोटारसायकली देण्यात आल्या;तसेच प्रति मोटरसायकल दोन होंडा सेफ्टी हेल्मेट व क्रुजर साइड बॉक्स देण्यात आला.


या उपक्रमाबाबत बोलताना, हरभजन सिंग म्हणाले, ‘एक जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून, होंडा टू व्हीलर्स नेहमीच समाजामध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठी बांधील राहिली आहे. सर्व नागरिकांच्या सुरक्षेची दखल घेत, कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमामध्ये योगदान देण्यासाठी आम्ही पुणे पोलिसांशी सहयोग केला आहे. तातडीने सुटकेची गरज लक्षात घेत, आम्ही पुणे पोलिसांच्या क्विक रेस्क्यू टीमला गुन्हे रोखण्यास मदत करण्याच्या हेतूने, आधुनिक पोलिस अॅक्सेसरीज असणाऱ्या १०० होंडा मोटरसायकल भेट म्हणून दिल्या आहेत. पुणे शहरापूर्वी, होंडाने यंदा हरयाणा व पंजाब पोलिस यांच्या कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांसाठी पाठिंबा देऊ केला असून, नजिकच्या काळात, ही मोहीम आणखी अंदाजे सात राज्यांमध्ये नेली जाणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search