Next
नाथ- अष्टांगयोग
BOI
Monday, April 01, 2019 | 10:22 AM
15 0 0
Share this article:

पातंजल योगसूत्र म्हणजेच अष्टांग योग. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही महत्त्वाची आठ अंग आहेत. त्यांची सत्य, अहिंसा, अस्तेय अशी बरीच उपांग आहेत. या सर्वांचे विवेचन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथ- अष्टांगयोग’मधून केले आहे.

पातंजल योगसूत्रांचा भावार्थ खूप वेगळ्या पद्धतीने यात मांडला आहे. अष्टांग योग म्हणजे काय हे सांगून आत्मज्ञानप्राप्तीसाठी नेमके काय केले पाहिजे हे थोडक्यात पण सोप्या भाषेत केले आहे. अष्टांगाशी संबंधित अनेक संकल्पना लेखिकेने उलगडून दाखविल्या आहेत. योग्याने संसारात राहून समतोल जीवन कसे जगावे, मनावर ताबा मिळवून मनाला परमशक्तीशी जोडून भौतिक आणि अध्यात्मिक जीवन संतुलित वृत्तीने कसे जगावे याचे मार्गदर्शन केले आहे. चित्तावरील विकारांचे पटल दूर झाले की आत्मज्ञान प्रकटत हा संदेश दिला आहे. एकूण ३४ छोट्या सूत्रांमधील खोल अर्थ यात समजावून दिला आहे.

पुस्तक :
नाथ- अष्टांगयोग
लेखक : डॉ. वृषाली पटवर्धन
प्रकाशक : आरंभ प्रकाशन
पाने : २९६
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search