Next
‘डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांना सहकार्य करा’
BOI
Friday, September 21 | 07:38 PM
15 0 0
Share this story



सोलापूर :
गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पंढरपूर येथे २१ सप्टेंबर २०१८ रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाला गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी या वेळी केले.



या जनजागृती रॅलीची सुरुवात अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी रॅलीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, तालुका पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, तसेच तालुक्यातील व शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रोटरी क्लबसह विविध संस्थांनी भाग घेतला होता.



रॅलीची सुरुवात टिळक स्मारक मैदानातून झाली. शिवाजी चौक, भादुले चौक, नाथ चौक, महाद्वार चौक, कालिका देवी चौक, चौफाळा येथून शिवाजी चौकामार्गे जाऊन सावरकर चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी चौक व सावरकर चौक येथे जनजागृतिपर पथनाट्य सादर केले.



‘डॉल्बी व डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा लहान बालके, वयोवृद्धांबरोबरच आजारी व्यक्तींना त्रास होतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नये. गणेश विसर्जन मिरवणूक आनंदी व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा,’ असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या वेळी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link