Next
‘डसॉल्ट’द्वारे स्टार्ट-अप्स, ‘एसएमईं’वर लक्ष केंद्रित
प्रेस रिलीज
Thursday, May 17 | 03:01 PM
15 0 0
Share this storyपुणे : २०१७मध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर डसॉल्ट सिस्टम्स या थ्रीडी एक्स्पिरिअन्स कंपनीने पुण्यात त्यांच्या ‘थ्रीडी एक्स्पिरिअन्स ऑन व्हील्स २०१८’ या उपक्रमाला सुरुवात केली. द्वितीय श्रेणी शहरातील लघु आणि मध्यम उद्योग आणि इंडस्ट्रियल हब्सपर्यंत पोहोचून त्यांना थ्रीडी एक्स्पिरिअन्स व्यासपीठाची ओळख करून देण्याचे उद्दिष्ट ‘थ्रीडी एक्स्पीरिअन्स ऑन व्हील्स’ या उपक्रमामागे आहे.

‘थ्रीडी एक्स्पीरिअन्स’ व्यासपीठ हे व्यवसायाचा अनुभव देणारे एक व्यासपीठ आहे. व्यवसायाची प्रत्यक्ष जागा आणि क्लाउडवर उपलब्ध असलेल्या या सोयीमुळे वापरकर्त्यांना आपल्या ग्राहकांसाठी एक आनंददायी अनुभव निर्माण करणे शक्य होणार आहे. थ्रीडी एक्स्पिरिअन्स व्यासपीठावर अथपासून इतिपर्यंत इंजिनीअरिंग, उत्पादन आणि व्यावसायिक क्षमता उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे, ‘एसएमई’जना कार्यक्षमता आणि किंमतीचे सुयोग्य मूल्य निर्माण करण्याबरोबरच आपला उद्योग चालवताना आवश्यक डेटा वापरून एकूण नुकसान कमी करणे शक्य होणार आहे. ‘डसॉल्ट सिस्टम्स’तर्फे इलेक्ट्रिक वाहनांच्या स्टार्ट-अप्समध्ये उत्पादन आणि परिसंस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी इलेक्ट्रो मोबिलिटी अॅसलरेटर या क्लाउड सुविधेचीही घोषणा करण्यात आली.

शुभारंभाच्या कार्यक्रमात डसॉल्ट सिस्टम्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सॅमसन खाऊ म्हणाले, ‘स्टार्ट-अप्स आणि ‘एमएमई’ क्षेत्र म्हणजे भारताच्या विकासातील सोन्याची खाण आहे. नावीन्यतेला आणि शाश्वत उत्पादन बनवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट-अप आणि एसएमईजना प्रत्येक पावलावर साथ देण्यास आम्ही बांधिल आहोत. क्लाउड हा यातील महत्त्वाचा दुवा आहे आणि उत्पादकांना अधिक चांगली उत्पादने निर्माण करता यावीत आणि उत्पादनात नाविन्यतेवर भर देता यावा यासाठी आम्ही ‘थ्रीडी एक्स्पिरिअन्स’ व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी संधी निर्माण करत राहू. इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या शाश्वत प्रयोगशीलतेसंदर्भातील सरकारच्या मोहिमेसोबत काम करण्याचा आमचा विचार आहे.’

‘थ्रीडी एक्स्पीरिअन्स ऑन व्हील्स २०१८’ हा बसवर उभारलेला फिरता लाउंज आहे. ही बस सहा महिन्यांच्या काळात भारतातील १६ राज्यांमधील २३ शहरांमध्ये प्रवास करून २५०हून अधिक कंपन्यांशी थेट संपर्क साधेल. पुण्यातून सुरू झालेली ही मोहीम महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये जाईल. या लाउंजमध्ये थ्रीडी एक्स्पिरिअन्स व्यासपीठ, ‘CATIA on Cloud’, सोशल अॅंड कोलॅबरेशन सर्व्हिसेस, पीएलएम कोलॅबरेशन सर्विसेस, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आदी आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान पाहता येतील,’ असे सॅमसन यांनी सांगितले.  
ते पुढे म्हणाले, ‘थ्रीडी एक्स्पिरिअन्स व्यासपीठाला नव्या ग्राहकांपर्यंत नेणे, नव्या बाजारपेठेत त्याची उपलब्धता निर्माण करणे या आमच्या धोरणांच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल म्हणजे थ्रीडी एक्स्पिरिअन्स ऑन व्हील्स.’

ऑटो, डिझाइन आणि व्हाइट गुड्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीचे आयटी डेस्टिनेशन आणि लॉजिस्टिक हब म्हणून पुण्याची नवी ओळख प्रस्थापित झाली असल्याने थ्रीडी एक्स्पिरिअन्स ऑन व्हील्सचा शुभारंभ पुण्यातून झाला. शिवाय, या भागात प्रचंड संख्येने लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग आणि मोठ्या कंपन्या असल्याने पुणे शहराने इंजिनीअरिंग आणि आर अॅंड डी क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

या मोहिमेचा शुभारंभ करताना सॅमसन पुढे म्हणाले, ‘पुण्यात आमची प्रबळ उपस्थिती आहे आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रावर सातत्याने भर दिल्याने प्रोडक्ट इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मोल्ड आणि टुलिंग इंजिनीअरिंग, प्रोसेस प्लॅनिंग, फेब्रिकेशन आणि मशिनिंग यासारख्या शॉप फ्लोअर प्रोसेस आणि उत्पादनातील प्रात्यक्षिके आम्ही मांडणार आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link