Next
जवानाच्या भूमिकेत दिसणार शर्मन जोशी
‘फौजी कॉलिंग’च्या निमित्ताने पहिल्यांदाच साकारणार सैनिक
BOI
Thursday, February 14, 2019 | 02:22 PM
15 0 0
Share this story


मुंबई : अभिनेता शर्मन जोशी, भारतीय जवानांच्या कौटुंबिक आयुष्यावर चित्रित ‘फौजी कॉलिंग’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. दिग्दर्शक आर्यान सक्सेना या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज असून अभिनेता रांझा विक्रम सिंघ हादेखील शर्मनबरोबर चित्रपटात दिसणार आहे. 

शर्मन जोशीचित्रपटाबाबत बोलताना शर्मन जोशी म्हणाला, ‘या चित्रपटाची कथा वाचली तेव्हापासूनच मी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. मी मनापासून या जवानांसाठी कृतज्ञ आहे. आपल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या देशाकडून, समाजाकडून काय अपेक्षित आहे, हेदेखील या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लवकरच या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे, याचा मला खूप आनंद होत आहे.’ 

दिग्दर्शक आर्यान सक्सेना यांनी दिग्दर्शित केलेला एक लघूपट नुकताच ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठी निवडण्यात आला आहे. ‘फौजी कॉलिंग’च्या निमित्ताने आर्यान चित्रपटांच्या दुनियेत पाय ठेवत आहेत. या चित्रपटाबाबत विचारले असता आर्यान यांनी सांगितले, ‘आजवर सैनिकांवर आधारित चित्रपटात आपण फक्त लढाया, युद्ध, त्यांचे सैनिकी जीवन पाहत आलो आहोत. परंतु ‘फौजी कॉलिंग’ हा एका सैनिकाच्या कौटुंबिक आयुष्यावर आधारित चित्रपट असेल. ज्यामध्ये एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या घरात काय परिस्थिती असते, त्याच्या कुटुंबाला काय सहन करावे लागते, त्यांच्यासमोरच्या समस्या काय असतात. आपल्या घरातला सैनिक कित्येक महिने घराबाहेर असताना त्यांची काय अवस्था असते. या सर्व गोष्टींवर आधारित हा चित्रपट असेल.’ 

आर्यान सक्सेनाआर्यान सक्सेना हे लेखक असून त्यांना दिग्दर्शनात यावेसे का वाटले, याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मला वाटते आपल्याकडच्या मानसिकतेनुसार चित्रपट लेखकाला फारसा आदर मिळत नाही. त्याचा विचार फार केला जात नाही. कित्येकदा माझी कथा असतानाही ती मला हवी तशी लोकांपर्यंत पोहोचत नाही, असे मला वाटते. त्यामुळे या चित्रपटाची कथा लिहिली, तेव्हा मला वाटले, मी स्वतःच चित्रपट दिग्दर्शित करावा.. आणि मी केला.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link