Next
‘ओकिनावा’चा महाराष्ट्रात विस्तार
प्रेस रिलीज
Thursday, March 29, 2018 | 02:04 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ओकिनावा ऑटोटेक या भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन कंपनीने मात्रोश्री मोटर्सच्या डीलरशिपखाली महाराष्ट्रात संगमनेर येथे आपले शोरूम सुरू केले आहे. या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी कृषी आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

या शोरूममध्ये ‘ओकिनावा’च्या ई-वाहनांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे आणि ई-वाहनांच्या विविध फायद्यांबाबत जागरूकता पसरविणे हा त्यांचा उद्देश आहे. या शोरूममध्ये ‘ओकिनावा’ने अलीकडे सादर केलेल्या रिज आणि प्रेज गाड्या विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या शोरूमद्वारे ‘ओकिनावा’च्या राज्यातील एकूण शोरूम्सची संख्या २० झाली आहे.

हे शोरूम शहरातील महत्त्वाच्या भागात असून, त्यात उत्तमरित्या प्रशिक्षित आणि जाणकार कर्मचारी नेमले आहेत. ‘ओकिनावा’च्या उत्पादनांबद्दल किंवा एकूणच विद्युत वाहनांबद्दल खरेदी करणाऱ्यांच्या शंकांचे निरसन हे कर्मचारी करू शकतील.

‘ओकिनावा’चे व्यवस्थापकीय संचालक जीतेंदर शर्मा म्हणाले, ‘ई-वाहनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या आणि ई-स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना ही वाहने सहज उपलब्ध करून देण्याच्या ‘ओकिनावा’च्या व्हिजनला अनुसरूनच हे शोरूम उघडण्यात आले आहे. आमच्या वाहनांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर शोरूम्सचे आणि फ्रँचाइजचे नेटवर्क विकसित करणे आणि अधिकाधिक ग्राहकांना ‘ओकिनावा’ची वाहने सहज उपलब्ध करून देणे हे अधिकच महत्त्वपूर्ण झाले आहे.’

भारतात विद्युत वाहन क्रांती सुरू करण्याच्या बाबतीत ‘ओकिनावा’ आघाडीवर आहे. ही कंपनी अशा स्कूटर सादर करते, ज्या एकाच वेळी परफॉर्मन्स, आराम, सुरक्षा, बचत आणि त्याचबरोबर पर्यावरणीय सुरक्षा प्रदान करते. या कंपनीचा उद्देश भारतातील विविध शहरांमध्ये आणखीन शोरूम्स आणि डीलरशिप सुरू करून स्थानिक डीलर्सशी चांगले संबंध प्रस्थापित करून आपल्या उत्पादनाचा प्रसार करणे हा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link