Next
आमंत्रण स्वर्गाचे
BOI
Thursday, February 14, 2019 | 10:18 AM
15 0 0
Share this story

मृत्यू ही आयुष्यातील अटळ घटना असली, तरी मृत्यू जेव्हा दाराशी येतो तेव्हा माणूस घाबरतो. या मृत्यूच्या भयाला दूर घालवून जीवनाचे सत्य समजावून देण्याचा प्रयत्न विशाल चिप्कर यांनी ‘आमंत्रण स्वर्गाचे’मधून केला आहे. यासाठी आपल्यातील आध्यात्मिकतेला प्राधान्य देण्यास ते सांगतात.

प्रथम विविध संज्ञांचा अर्थ स्पष्ट करीत स्वतःचा परिचय   स्वतःच करून घेत शेवटच्या निवाड्याचा दिवस म्हणजेच मृत्यूचे सहज रूप यातून दाखविले आहे. कलियुगातील गोंधळाच्या वातावरणात निराकार ईश्वराचे स्मरण, परमोच्च शक्तीशी असलेले अस्तित्व एकरूप होऊ देणे म्हणजे स्वर्गाचे दार उघडण्याची सुरुवात आहे, असे लेखकाने म्हटले आहे.

परमोच्च विश्वाची निर्मिती, शाश्वत अमृत निर्मिती, चेतन
भाव-दैवी कुतूहल, रूपांतर व उत्क्रांती प्रक्रिया विषद करीत स्व-अज्ञान, अहंकार आणि अप्रगल्भता यांची साथ सोडण्याची गरज यात व्यक्त केली आहे. चुकीच्या श्रद्धा व अज्ञान दूर सारून स्व-उन्नती करणाऱ्यांसाठी यातून मार्गदर्शन केले आहे. याचा मराठी अनुवाद शुचिता फडके यांनी केला आहे.         
 
पुस्तक : आमंत्रण स्वर्गाचे
लेखक : विशाल चिप्कर
अनुवादक : शुचिता फडके
प्रकाशक : सुपरह्युमन एनपीओ, न्युयॉर्क, युनायटेड स्टेट्स
पाने : ३२२
किंमत : ३५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link