Next
पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८)
BOI
Tuesday, May 15 | 10:26 AM
15 0 0
Share this story

देशाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा असतो. त्यामुळे त्याविषयी नीट माहिती करून घेणे आवश्यक असते. विशेषतः आयकरकपात हा विषयक नोकरदार व्यक्तींसाठी जिव्हाळ्याचा असतो. अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात याच विषयावर मार्गदर्शन केले आहे. २०१७-१८ चा अर्थसंकल्प आर्थिक कायदा आणि महत्त्वाचे बदल, आयकर कपात : संकल्पना, पगारातून आयकरकपातीची व्याप्ती, करकपातीला पात्र पगाराची निश्चिती, पगारातून विचारात घ्यायच्या वजावटी या स्वतंत्र प्रकरणांमधून गोडबोले यांनी प्रथम विषय स्पष्ट केला आहे.

करकपातीची कार्यपद्धती समजते. त्यानंतर पगारातून आयकरकपात या विषयावरील पाच प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांनी दिली आहेत. करकपातीचे प्रमाणपत्र, तिमाही विवरणपत्रके याची माहिती मिळते. घरापासूनचे उत्पन्न, भांडवली नफ्याचे उत्पन्न हे मुद्दे उपस्थिती करून व्यक्तिगत रिटर्न भरण्याचे मार्गदर्शन केले आहे. ई- फायलिंगविषयीही समजते.

प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : १७२
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link