Next
सूत्रसंचालनाचे अंतरंग
BOI
Saturday, June 09 | 10:31 AM
15 0 0
Share this story

सूत्रसंचालन हे केवळ दोन वक्त्यांमधील दुवा नसते. ते व्यासपीठ आणि श्रोते आणि प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असले पाहिजे. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी त्याने पुन्हा-पुन्हा श्रोत्यांना गुंतवून ठेवणे सूत्रसंचालन करताना महत्त्वाचे असते. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी सूत्रसंचालकाची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर संकलक प्रा. दिगंबर ढोकले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकलेल्या व्याख्यानांतील, वाचलेल्या पुस्तकांतील विचारांचा एकत्रित संग्रह केला होता. हा संग्रह ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकातून समोर आला आहे.

संकलक स्वतः सूत्रसंचालक असल्याने त्यांनीही या अक्षरधनाचा उपयोग करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. या पुस्तकातील उपयुक्त अवतरणे, काव्यपंक्ती, बोधकथा, श्लोक, सुभाषिते सूत्रसंचालकाला नक्कीच मदत करणारी ठरू शकतात त्यामुळे सभा गाजविण्याची इच्छा असलेल्या सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे.

प्रकाशक : काशाय प्रकाशन
पाने : १९२
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link