Next
पुण्यात ३० सप्टेंबरला दातार कुलसंमेलनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, September 25, 2018 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

डॉ. धनंजय दातारपुणे : दातार घराण्याच्या पुढील पिढ्यांना माहिती मिळून ते एकत्र यावेत, दातार कुलवृत्तांत अद्ययावत व्हावा व दातार आडनाव भूषविणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान व्हावा, या तिहेरी हेतूने ‘अखिल दातार कुलसंमेलन २०१८’ आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते होणार आहे.

हा मेळावा ३० सप्टेंबरला पुण्यातील कर्वेनगरमधील प्रतिज्ञा हॉलमध्ये येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदिका व कुलसंमेलनाच्या सूत्रसंचालक मीनल दातार या डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरूडभरारी घेणारे आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणारे डॉ. दातार या मुलाखतीतून नवउद्योजकांना मार्गदर्शन करतील.

‘अखिल दातार कुलसंमेलन २०१८’ हा उपक्रम म्हणजे दातार हे कुलनाम असणाऱ्यांचे, तसेच मूळचे दातार परंतु कालौघात आघरकर, आगरकर, फडणीस, वर्तक, सबनीस, कुलकर्णी, दफ्तरवार व चौकर ही उपनामे लावणाऱ्यांचे स्नेहसंमेलन आहे.

या स्नेहसंमेलनाच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट करताना या कुलसंमेलनाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले, ‘दातार कुलनाम असणाऱ्या व्यक्तींची माहिती असलेला दातार कुलवृत्तांत सन १९७४मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर गेली ४४ वर्षे तो अद्ययावत झाला नाही आणि दातार कुलनामाचा मेळावाही व्यापक पातळीवर झाला नाही. दातार घराण्याच्या पुढील पिढ्यांना ही माहिती मिळून ते एकत्र यावेत, दातार कुलवृत्तांत अद्ययावत व्हावा व दातार आडनाव भूषविणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान व्हावा, या तिहेरी हेतूने आम्ही हा उपक्रम आखला असून, त्याची सुरुवात पुण्यापासून होत आहे.’

‘महाराष्ट्रभर, तसेच इतर राज्यांत स्थाईक झालेले दातार या मेळाव्यासाठी येणार असून, सुमारे ४०० लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मेळाव्यात ज्येष्ठ व्हायोलिन वादक पद्मश्री डी. के. दातार, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार, जागतिक कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखील दातार, शस्रास्र रचना तज्ज्ञ तसेच आर्मामेंट्स विभागाचे माजी सरसंचालक अनिल दातार, महाराष्ट्र भूषण अरुण दातार, गीता धर्म प्रसारक डॉ. मुकुंद दातार, गायिका प्रमिला दातार आदी दहा नामवंत दातार व्यक्तींचा सत्कार केला जाईल. दातार कुलनाम भूषवणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही या वेळी होईल,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

‘या प्रतिष्ठित मेळाव्यात सहभागी होण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी आनंददायक असून, दातार कुलनामाच्या अनेक ख्यातनाम व्यक्तींपैकी एक असणे गौरवास्पद आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. दातार यांनी व्यक्त केली आहे.

उद्घाटनाविषयी :  
दिवस :
रविवार, ३० सप्टेंबर २०१८
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : प्रतिज्ञा हॉल, कर्वेनगर, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vishwas kashinath Datar About 281 Days ago
Please make this Kulvrutant available to me.
0
0
Girish DATAR About 322 Days ago
It very nice achievement for all DATAR family members
0
0
Anand Laxman Datar About 323 Days ago
I am thrilled to attend this historic gathering of all Datars ! All The Best !!
0
0

Select Language
Share Link
 
Search