Next
बटाटे पिकवणाऱ्या कुरवंडी गावात भरली शेतीशाळा
डॉ. अमोल वाघमारे
Friday, August 17, 2018 | 04:27 PM
15 0 0
Share this article:आंबेगाव (पुणे) :
शेतकरी आणि शेतीमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांच्यातील सुसंवाद ही शेती-प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरातील कुरवंडी गावात नुकताच अशा प्रकारचा उपक्रम पार पडला. 

शेती आणि शेतकरी हा विषय आज संवेदनशील झालेला आहे. शेतकरी आत्महत्या व एकूणच शेतीवरील अरिष्ट हा सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतीवरचे अरिष्ट ही निश्चितच भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर शेतीवरील अरिष्ट संपुष्टात आणण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. यातीलच एक प्रमुख गोष्ट म्हणजे शेतकरी आणि शेतीत संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांच्यातील सुसंवाद होय. 

सातगाव पठार हा बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रदेश म्हणून सर्व महाराष्ट्रास सुपरिचित असा आहे. या भागात मुख्यतः बटाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकाच्या अनुषंगाने प्रत्यक्षात शेतामध्येच या गावातील शेतकऱ्यांना या पिकाविषयी प्रात्यक्षिकांच्या आधारे माहिती देण्यात आली. 

कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, तालुका कृषी कार्यालय, घोडेगाव, आत्मा विभाग व ग्रामपंचायत कुरवंडी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आदर्श गाव कुरवंडी येथे हा शेतीशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्रज्ञ श्री. गावडे, आत्मा विभागाचे गणेश पडवळ व कृषी सहायक श्रीमती प्रमिला मडके आदी उपस्थित होते.
 
बटाटा या पिकाचे व्यवस्थापन कसे करावे, खते व कीडनाशक फवारणी कशी व केव्हा करावी, या पिकाला कीड लागू नये म्हणून काय काळजी घ्यावी, यासाठीचे आवश्यक ते मार्गदर्शन तज्ज्ञांनी या वेळी शेतकऱ्यांना केले. शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली. 

हा कार्यक्रम गावाचे सरपंच विशालभाऊ तोत्रे, उपसरपंच कैलास तोत्रे आणि आदर्श गाव ग्रामकार्यकर्ता रवींद्र तोत्रे यांच्या सहकार्यातून पार पडला. या वेळी रमेश तोत्रे, नितीन तोत्रे, आनंदा तोत्रे, सुरेश तोत्रे, दिनकर बारवे, प्रवीण तोत्रे, बबन तोत्रे, अनिल तोत्रे, मारुती तोत्रे, रोहिदास बारवे, बाळू गटे आदी शेतकरी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search