Next
प्रेमलाताई चव्हाण विनोदी कथा स्पर्धेत सहभागाचे आवाहन
गुंफण अकादमीतर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा
BOI
Tuesday, July 09, 2019 | 03:00 PM
15 0 0
Share this article:

सातारा : सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेसाठी आपल्या कथा पाठवण्याचे आवाहन अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे.

‘मागील पिढीत एकाहून एक सरस विनोदी लेखकांची फळी होती. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडायच्या. अशा विनोदी लेखकांचे कथाकथनाचे कार्यक्रम तुफान गाजले होते; परंतु त्यांच्यानंतर तसे लेखक फारसे घडले नाहीत. ही विनोदी लेखनाच्या बाबतीत जाणवणारी पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने विनोदी लेखन व लेखक यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अकादमीच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठा प्रतिसाद मिळत असतो. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या विनोदी कथा स्पर्धेचे हे सतरावे वर्ष आहे,’ असे डॉ. चेणगे यांनी सांगितले.

‘अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लेखकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे,’ असे आवाहन डॉ. चेणगे यांनी केले.  

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, लेखकांनी आपली सुटसुटीत विनोदी कथा कागदाच्या एका बाजुस सुवाच्च अक्षरात लिहून अथवा टाईप करून, खालील पत्त्यावर ३१ जुलै २०१९ पर्यंत पाठवावी.

पत्ता : गुंफण अकादमी, द्वारा विकास धुळेकर, १४६ अ, साईलीला अपार्टमेंट, प्रतापगंज पेठ, सातारा
मोबाइल : ९८५०६ ५९७०८, ९८८१७ ३९७१०  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search