Next
‘कोलगेट’ सर्वाधिक विश्वासार्ह मौखिक ब्रॅंड
प्रेस रिलीज
Monday, March 25, 2019 | 12:58 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड या बाजारपेठेतील आघाडीच्या मौखिक आरोग्य ब्रॅंडने ‘मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड सर्व्हे २०१८’ असा किताब सलग आठव्या वर्षीही पटकावला आहे. हा सर्व्हे ‘इकोनॉमिक टाइम्स- ब्रॅंड इक्विटी’च्या वतीने नेल्सनद्वारा करण्यात आला होता.

या विषयी बोलताना कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक इस्साम बच्चलानी म्हणाले, ‘दर वर्षी आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कोलगेट हा भारतातील सर्वांत विश्वासार्ह मौखिक आरोग्याचा ब्रॅंड ठरल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भारताला सातत्याने हसरे ठेवताना आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी आम्ही १०० टक्के वाहून घेऊन त्यांना सर्वांत सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेची उत्पादने देत आहोत.’

‘दी ब्रॅंड इक्विटी मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड्स सर्व्हे’चे आयोजन नेल्सनने केले होते. पहिल्या टप्प्यात विक्री, सामाजिक उत्साह आणि मीडिया व्हिजिबिलीटी डाटा यांवर संशोधन करण्यात आले. त्यानंतर त्यावर संशोधन करून त्यावर चर्चा करून ‘मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड २०१८’ ग्राहक सर्वेक्षणाचे निष्कर्ष काढण्यात आले. योग्य मुल्यमापन करून मग त्यातून ब्रॅंडची निवड करण्यात आली. या सर्व्हेक्षणात एकूण ३४१ ब्रॅंड्सबद्द्दल दोन हजार २०० लोकांचा विचार जाणून घेण्यात आला. हा सर्व्हे जानेवारी २०१९मध्ये मुंबई यूए,  दिल्ली एनसीआर, चेन्नई आणि कलकत्ता या चार महानगरांमध्ये करण्यात आला होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search