Next
गोविंदराव टेंबे, डॉ. आशुतोष जावडेकर
BOI
Tuesday, June 05, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

जुन्या पिढीचे सुप्रसिद्ध नाटककार आणि संगीतकार गोविंदराव टेंबे आणि नव्या पिढीचे संगीतकार, गायक डॉ. आशुतोष जावडेकर यांचा पाच जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय..
....
गोविंद सदाशिव टेंबे 
पाच जून १८८१ रोजी जन्मलेले गोविंदराव टेंबे हे नाटककार आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. ते उत्कृष्ट संवादिनीवादक होते आणि पंडित भास्करबुवा बखले यांच्या साथीला ते असत. 

१९१३ साली सुरू झालेल्या ‘गंधर्व नाटक मंडळी’चे ते महत्त्वाचे आधारस्तंभ होते. ऑपेरा प्रकार मराठीमध्ये आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. ‘प्रभात’सारख्या मातब्बर चित्रपटनिर्मिती संस्थेत त्यांनी मोठं योगदान दिलं होतं. माझा संगीत व्यासंग, माझा जीवनविहार, कल्पनासंगीत, महाश्वेता, जयदेव, वरवंचना, तुलसीदास, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

नऊ ऑगस्ट १९५५ रोजी त्यांचं निधन झालं. 
........

डॉ. आशुतोष जावडेकर 

पाच जून १९७९ रोजी जन्मलेले डॉ. आशुतोष प्रकाश जावडेकर हे व्यवसायानं डेंटिस्ट असून, कवी, गायक, संगीतकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘प्रथमतः मी लेखक आहे, गाणे आणि संगीत ही माझी आवड आहे आणि मी प्रोफेशनने डेंटिस्ट आहे,’ असं ते म्हणतात. नव्या पिढीच्या गायकीचा आणि संगीताचा त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि या संदर्भात त्यांनी बरंच लेखन केलं आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे आणि इस्लामपूर शाखेतर्फे मार्च २०१८मध्ये इस्लामपुरात आयोजित करण्यात आलेल्या  युवा साहित्य-नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद डॉ. जावडेकर यांनी भूषविलं आहे. मराठी भाषेबद्दलचे त्यांचे विचार https://youtu.be/BiHA8oHK95c या व्हिडिओत त्यांनी व्यक्त केले आहेत.

लयपश्चिमा, मुळारंभ, नवे सूर अन् नवे तराणे, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियाचाही ते लेखनासाठी प्रभावी वापर करतात. भाषण किंवा वृत्तपत्रात एखाद्या विषयावर लेख लिहिण्यापूर्वी सोशल मीडियावरून तरुणाईची मतं मागवून, त्यावर अभ्यास करून स्वतःची निरीक्षणं नोंदवणं आणि मतं मांडणं, अशा पद्धतीचा अवलंब ते करतात. त्यामुळे आपसूकच त्यांच्या लेखनात जनमानसाचं प्रतिबिंब पडतं. त्यामुळेच ते आजच्या पिढीचे लोकप्रिय लेखक आहेत.

(डॉ. आशुतोष जावडेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search